महाराष्ट्र

जहाल Naxl ताराक्कासह 11 जणांची शरणागती

Gadchiroli मध्ये मुख्यमंत्र्यांसमोर टाकली शस्त्र

Author

गडचिरोलीतील माओवादी चळवळीचा जवळपास बिमोड झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (01 जानेवारी) गडचिरोली गाठले. त्यांच्या समोर 11 जहाल माओवाद्यांनी शस्त्र टाकली आहेत.

2025 या नवीन वर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीसाठी ऐतिहासिक ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढं जहाल माओवादी ताराक्कासह 11 जणांनी शस्त्र टाकत आत्मसमर्पण केलं. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांत प्रथमच अहेरी ते गर्देवाडा ही बस सेवा सुरू झाली. या बसमधून मुख्यमंत्र्यांनी प्रवासही केला. लॉइडच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला. यातून 6 हजार 200 कोटींची गुंतवणूक होणार आहे. चार हजारावर रोजगार निर्मिती प्रकल्पातून होत आहे.

गडचिरोली आगमन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट ताडगुडा पूल येथे गेले. गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्गाचे त्यांनी लोकार्पण केलं. ताडगुडा पुलाचेही लोकार्पण केले. पेनगुंडा येथे त्यांनी पेालिस दलातील जवानांशी, ग्रामस्थांशी संवाद साधला. गडचिरोलीतील हा परिसर अतिदुर्गम आहे. या गावात पोहोचणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरले. पेनगुंडात जात त्यांनी वेगळा संदेश दिला.

मोठ्या Project मधून विकास

कोनसरी येथे लॉइड्सच्या विविध उपक्रमांचा फडणवीस यांनी शुभारंभ केला. कोनसरी येथे डीआयआय प्लांट आहे. त्यात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. 700 जणांना रोजगार यातून मिळणार आहे. पेलेट प्लांट आणि स्लरी पाइपलाइन मध्ये तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. यातून एक हजार रोजगार निर्मिती होणार आहे. हेडरी, एटापल्ली येथे आयर्न ओअर ग्राईडिंग प्लांट आहे. येथे 2 हजार 700 कोटींची गुंतवणूक आहे. यातून 1 हजार 500 जणांना रोजगार मिळणार आहे.

पवार कुटुंबावरून Amol Mitkari यांचा दोन आमदारांवर हल्लाबोल 

वन्या गारमेंट युनिटमध्ये 20 कोटी रुपये गुंतवणूक आहे. येथे 600 जणांना रोजगार मिळेल. लॉइड्स काली अम्मल हॉस्पिटलचाही शुभारंभ फडणवीस यांनी केला. लॉइडस राज विद्यानिकेतन सीबीएसई शाळेचेही उद्घाटन केले. येथे सुमारे 1 हजार 200 विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे. पोलिसांसाठी निवासस्थाने, जिमखाना, बालोद्यान इत्यादींचेही लोकार्पण फडणवीस यांच्या हातून करण्यात आले. कामगार आणि पूर्वाश्रमीच्या माओवाद्यांनी कंपनीचे एक हजार कोटींचे शेअर्स प्रदान करण्यात आले. यातून त्यांना एक प्रकारे मालकी देण्याचाही उपक्रम लॉइड्सने केला. हे शेअर्स मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Mines आणि Fule बचत

फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोलीत ग्रीन माइनिंगचाही शुभारंभ करण्यात आला. यातून खाणींचे संरक्षण होणार आहे. लोहखनिजासाठी स्लरी पाइपलाइनमुळे इंधन बचत होणार आहे. कार्बन उर्त्सजन कमी होईल. रस्त्यावरील अपघातही कमी होतील. ग्रीन माइनिंगचा प्रयोग गडचिरोलीत प्रथमच होत आहे. गोंडवाना विद्यापीठाचा ऑस्ट्रेलियन विद्यापीठाशी करार करण्यात आला आहे. यातून मायनिंगशी संबंधित सर्व अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळं गडचिरोलीतील तरुणांनाच रोजगार मिळणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितलं.

फडणवीस यांच्या उपस्थितीत 11 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात आठ महिला आणि तीन पुरुष आहेत. दोन दाम्पत्य आहेत. आत्मसमर्पण केलेल्या 11 जणांवर महाराष्ट्रात एक कोटींपेक्षा जास्त बक्षीस होते. छत्तीसगड सरकारने सुद्धा त्यांच्यावर बक्षिस जाहीर केले होते. दंडकारण्य झोनल कमिटीच्या प्रमुख आणि भूपतीची पत्नी ताराक्का हिचा यात समावेश आहेत. ताराक्का 34 वर्षांपासून नक्षली चळवळीत होती. तीन डिव्हिजन किमिटी मेंबरही शरण आले आहेत. एक उपकमांडर, दोन एरिया कमिटी मेंबर्सने शस्त्र टाकली आहेत. या सर्वांना 86 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली.

मोठे Naxal Encounter

गेल्या वर्षात गडचिरोलीत 24 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 18 माओवाद्यांना अटक करण्यात आली. गेल्या सहा महिन्यात 16 जहाल माओवदी शरण आलेत. आतापर्यंत एकूण 27 माओवादी शरण आले आहेत. त्यामुळं उत्तर गडचिरोली माओवादमुक्त झाली आहे. लवकरच दक्षिण गडचिरोली सुद्धा माओवादमुक्त होईल. गेल्या चार वर्षांत एकही युवक, युवती गडचिरोलीतून माओवादी चळचळीत सहभागी झालेली नाही. गडचिरोलीतील 11 गावांनी माओवाद्यांना बंदी केली आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!