महाराष्ट्र

अकोला, अमरावती, नागपूरसह प्रजासत्ताक दिनी विदर्भातील 34 जाणार Delhi

ध्वजारोहणासाठी Central Government कडून मिळालं निमंत्रण

Author

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणारा राष्ट्रीय सोहळा दिमाखदार असतो. या सोहळ्यासाठी विदर्भातून यंदा 34 जणांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या सोळ्याची जय्यत तयारी आता सुरू झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या सोहळ्याला देश-विदेशातील मान्यवर येणार आहेत. देशाच्या या शाही सोहळ्यासाठी विदर्भातील 34 जणांना निमंत्रण देण्यात आलं आहे. वेगवेगळ्या मंत्रालयाकडून हे निमंत्रण पाठविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विदर्भातून दिल्लीला जाणाऱ्या या पाहुण्यांसाठी प्रवास आणि सुरक्षा पासेसची व्यवस्थाही प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. लवकच ही मंडळी दिल्लीकडे रवाना होतील असं सांगण्यात येत आहे. दिल्लीतील कर्तव्य पथावर 26 जानेवारी रोजी मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी देशभरातून सुमारे दहा हजारावर मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यात या 34 जणांचाही समावेश असल्याची माहिती नागपूरचे ग्रुप कॅप्टन रत्नाकर सिंह यांनी दिली. नागपुरातील सैन्य दलाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अकोला येथुन अमन विलास महल्ले यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यांनी पेयजल आणि सांडपाणी व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वंदना बापुराव राठोड या देखील अकोला जिल्ह्यातून दिल्लीला जाणार आहेत.

नवीन District निर्मितीचा प्रस्ताव अद्यापही प्रतीक्षेत

मोठ्या प्रमाणावर Guest

शाही ध्वजारोहण सोहळ्याला मोठ्या प्रमाणवर अतिथी येणार आहे. अमरावती जिल्ह्यातून विजय रुपराव ढेपे यांना निमंत्रण मिळालं आहे. आदिवासी कल्याण मंत्रालयाकडून अमरावतीचे अशोक मोतीराम केदार यांनाही सोहळ्यासाठी बोलावण्यात आलं आहे. वन्यजीव विभागाच्या सायबर सेलकडून फॉरेस्ट गार्ड आकश अनिल सारडा हे सोहळ्याचे पाहुणे असतील. पंचायत राज विभागाकडून अमरावती जिल्ह्यातील सरपंच योगिता विशाल रीठे यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातूनही पाहुण्यांना दिल्ली येथे बोलावण्यात आलं आहे. आदिवासी विभागानं गिता शिवाजी आत्राम यांना पतीसह बोलावणं पाठवलं आहे. हरीभाऊ दामोधर मनवर, शैलेश सुधाकर निस्ताने, अमित अरूण लांडगे हे देखील यवतमाळ जिल्ह्यातून दिल्लीला जाणार आहेत.

वाशिम जिल्ह्यातून अमोल अशेाक ठाकरे हे परेडचे साक्षीदार ठरतील. बुलढाणा जिल्ह्यातून ऋतुजा रवींद्र महाजन यांना बोलावण्यात आलं आहे. विनोद श्रीराम हिवाळे हे बुलढाणा जिल्ह्यातील उत्कृष्ट डीजीटी प्रशिक्षणार्थी ठरले आहेत. त्यांनाही दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. अतुल विष्णू भाग्यवंत हे देखील दिल्लीत परेडच्या दिवशी असतील. वर्धा जिल्ह्यातून मंगेश लक्ष्मण कावरे यांना निमंत्रण मिहालं आहे. नागपूर जिल्ह्यातून अॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड क्षेत्रात काम करणारे गोपाल हंसराज वासनिक हे दिल्ली येथे निमंत्रित आहेत. जावेद खान कलीमुद्दीन खान पठाणे हे देखील नागपुरातून जाणार आहेत. पंकज नागोराव साबरे यांचाही समावेश नागपुरातून आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Nana Patole यांच्या जागी नवा चेहरा

पूर्व Vidarbha मधीलही अनेक

पूर्व विदर्भातूनही अनेक मान्यवरांचं नाव दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी अतिथी म्हणून आहे. चंद्रपुरातून शालु दिलीप रामटेके जाणार आहे. युवक कल्याण विभागानं चंद्रपुरातून माय भारत स्वयंसेवक गौरव शंकर वेलादी यांना निमंत्रण दिलं आहे. वन आणि वन्यजीव विभागाच्या यादीत चंद्रपूरचे स्वयंसेवक डॉ. रवींद्र शामराव खोब्रागडे यांचं नाव आहे. सुधाकर तुळशीराम रोहणकर यांचंही नाव चंद्रपुरातून आहे.

भंडारा जिल्ह्यातून तेजराव रानुबा नरवाडे हे दिल्ली येथे जाणार आहेत. पुरुषोत्तम रूखमोडे यांचंही नाव यादीत आहे. गोंदिया जिल्ह्यातून सागरबाई दिलीप चिमणकर, शैला सुरेश उईके, भूषण सुरेश उईके, पुस्तकला राजकुमार मडावी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. सहकार विभागाकडून रामलाल गजानन कापते यांना निमंत्रण आहे. देवचंद मणिराम पटले हे देखील गोंदियातून दिल्लीला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातून संजय गजानन निखारे, मानराव इजामसा काटेंगे, इजामसा संजू काटेंगे यांना प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी निमंत्रण पाठविण्यात आलं आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!