महाराष्ट्र

Amravati : काँग्रेस विरोधात भाजपने काढली प्रेतयात्रा, पोलिसांशी झटापट

BJP : झणझणीत घोषणांनी काँग्रेस भवन हादरल

Author

नॅशनल हेरॉल्ड घोटाळ्याच्या निषेधार्थ अमरावतीत भाजपने काँग्रेसविरोधात आक्रमक आंदोलन केलं. प्रेतयात्रा, घोषणाबाजी आणि पोलिसांशी झटापटीमुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.

नॅशनल हेरॉल्ड घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात भाजपने काँग्रेसविरोधात आक्रमक आंदोलन छेडले. या प्रकरणात काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी शहरात जोरदार मोर्चा काढला. या आंदोलनात भाजपच्या युवा मोर्चासह स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मालटेकडी परिसरातून निघालेल्या या मोर्चात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आणि प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.

भाजप कार्यकर्त्यांचा मोर्चा श्यामनगर चौक ते काँग्रेस भवन असा नियोजित होता. मात्र, काँग्रेस भवनासमोर मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते देखील जमले होते. त्यामुळे दोन्ही गट आमने-सामने येण्याची स्थिती निर्माण झाली. संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी शहर पोलिस दलाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता. बंदोबस्त असूनही भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले असता, पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. काही वेळासाठी वातावरण चिघळले आणि तणाव वाढला.

MNS : ठाकरे बंधूंच्या युतीवरून रणसंग्राम पेटले

वाहतूक कोंडी

पोलिसांनी मोर्चा थांबवण्यासाठी अडथळे निर्माण केले होते, पण आंदोलकांनी अडथळा फोडण्याचा प्रयत्न केल्याने राडा उफाळून आला. या सगळ्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. अमरावतीत अचानक वाढलेल्या राजकीय तापमानामुळे सामान्य नागरिकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागला. श्यामनगर ते काँग्रेस भवन हा प्रमुख मार्ग काही वेळासाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली.

आंदोलनात भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, शहर जिल्हाध्यक्ष, नगरसेवक, तसेच इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी काँग्रेसवर “देशविघातक कारभार” आणि “भ्रष्टाचाराचे केंद्र” असल्याचा आरोप केला. आंदोलनादरम्यान त्यांनी काँग्रेसविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या समर्थनार्थ गर्दी केली होती.

Uday Samant : ठाकरेंचं एकत्र येणं म्हणजे उपरोधाचं राजकारण

आंदोलनामुळे अमरावती शहरात राजकीय अस्थिरता आणि सामाजिक तणाव जाणवू लागला. शहर प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. सुदैवाने कोणतीही मोठी हिंसक घटना घडली नाही, मात्र परिस्थिती अजूनही संवेदनशील असल्याने पोलिस सतर्क आहेत. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या सावलीत सुरु असलेल्या या आंदोलनाने अमरावतीच्या राजकारणात नव्याने उष्मा निर्माण केला असून येणाऱ्या काळात अशाच प्रकारचे आणखी आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!