
काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्राच्या सहा निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून राज्यात शोककळा पसरली आहे.
काश्मीरमधील सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी गेलेल्या पर्यटकांच्या आयुष्यात अचानक आलेल्या या दहशतीच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचाही समावेश आहे. या घटनेची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत निंदा केली आहे. हा हल्ला कायरतापूर्ण असून मानवतेवर झालेला घात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की, मृत पर्यटकांचे मृतदेह महाराष्ट्रात परत आणण्यासाठी शासनातर्फे तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तातडीने काश्मीरमध्ये दाखल होणार आहे. तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील इतर पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी मदतकार्य करतील, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
Chandrashekhar Bawankule : विदर्भाच्या भविष्यासाठी जलसिंचन प्रकल्पाला गती
विकासाच्या अध्यायात अडथळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी या भ्याड हल्ल्याच्या मास्टरमाइंडला शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करतील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 हटविल्यानंतर विकासाचा नवा अध्याय सुरू झाला होता. पण अशा दहशतवादी कारवायांनी देशात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, देश याला झुकणार नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
काश्मीर हे देशातील एक अत्यंत सुंदर पर्यटनस्थळ मानलं जातं. परंतु अशा घटनांमुळे पर्यटनावर नकारात्मक परिणाम होत आहे. तरीही केंद्र व राज्य सरकार दोघंही या परिस्थितीवर मात करण्यासाठी सज्ज आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव मिळावा, यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
Prakash Ambedkar : जम्मू काश्मीरमधून महाराष्ट्रातील पर्यटकांचा बचाव
दहशतवाद्यांचा हेतू देशात भीती निर्माण करण्याचा असतो, पण भारतातल्या जनतेचा निर्धार, शौर्य आणि एकता यांना हरवणं अशक्य आहे. पहलगामच्या हल्ल्यानंतरही देश अधिक सजग, अधिक दृढ, आणि अधिक एकसंघ झाला आहे. याचं उत्तर हे केवळ कारवाईच नाही, तर एकत्र येऊन उभं राहणं आहे.