प्रशासन

Shalartha Scam : आयडीपीआरनं उघड केली खरी संख्या

Nagpur : शिक्षण खात्याचा विस्फोटक भोंगळ कारभार

Author

नागपूरमध्ये सायबर पोलिसांनी शालार्थ आयडी घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. आयडीपीआर तपासात 622 बनावट शिक्षकांची नावे समोर आली आहेत.

नागपूरमध्ये सायबर पोलिसांनी उघडकीस आणलेला शालार्थ बनावट आयडी घोटाळा दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. सुरुवातीला 580 शिक्षकांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, सायबर पोलिसांच्या तांत्रिक तपासात आणखी 42 बनावट आयडी आढळल्याने ही संख्या आता थेट 622 वर पोहोचली आहे. हे प्रकरण केवळ फसवणुकीपुरते मर्यादित नसून शिक्षण क्षेत्रावरच गहिरे प्रश्न उपस्थित करणारे आहे.

शालार्थ बनावट आयडी प्रकरणाचा उगम झाला तो पोलिसांकडे दाखल झालेल्या एका तक्रारीमधून. नीलेश वाघमारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाच्या फेऱ्या सुरु झाल्या. विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक झाली. त्यांच्या आयडीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

Pahalgam Attack : पीओके पंतप्रधानांचे भडक विधान, भारताला थेट धमकी

तपासातून माहिती उघड

उल्हास नरड यांच्या लॉगिनचा तपशील तपासल्यानंतर सायबर पोलिसांनी वापरलेल्या आयपी अ‍ॅड्रेसचा आयडीपीआर रिपोर्ट मागवला. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली की, या प्रकरणात एक-दोन नव्हे तर तब्बल 622 शिक्षकांचा सहभाग आहे. आयडीपीआर तपासामुळे बनावट आयडी तयार करताना नेमके कोणकोणते आयपी वापरण्यात आले, ते कोणत्या ठिकाणांहून जनरेट झाले आणि त्यामागे कोण आहेत, हे सगळे तपशील स्पष्ट झाले आहेत. एनआयसीकडून पोलिसांना दिलेल्या डेटामध्ये किती वेळा आयपी अ‍ॅड्रेस जनरेट झाला. त्या प्रत्येक वेळी कोणत्या शिक्षकाच्या नावाने शालार्थ आयडी तयार झाला, याची माहिती मिळाल्यानंतर या घोटाळ्याचे स्वरूप आणि व्याप्ती वाढले आहे. यामुळे आता सायबर पोलिसांची तपासाची दिशा अधिक ठोस झाली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

सायबर पोलिसांनी सुरुवातीला 580 शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाकडे मागवली होती. परंतु, त्यातील केवळ 75 शिक्षकांची कागदपत्रे विभागाकडून सादर करण्यात आली. उर्वरित 505 शिक्षकांची माहिती अद्यापही पोहोचलेली नाही. विभागाची ही दिरंगाई तपासाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करत असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत. दरम्यान, पोलिसांनी आणखी 117 शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाकडे मागवली आहे. ती नावेही आयडीपीआर यादीत समाविष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता एकूण संशयित शिक्षकांची संख्या 622 झाली आहे. या सर्व प्रकरणात शिक्षण विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईची तलवार टांगती आहे.

Chandrashekhar Bawankule : शिंदे, महाजन एकत्र कार्यरत आहेत

शैक्षणिक व्यवस्थापन धोक्यात

नागपूर जिल्ह्यातील शैक्षणिक व्यवस्थापनावर या प्रकरणामुळे मोठा आघात झाला आहे. एका लॉगिन आयडीवरून शेकडो बनावट आयडी तयार होतात याचे कोणालाच भान नव्हते का, असा प्रत्यक्ष विचार आता प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर होत आहे. यामध्ये अनेक शिक्षकांचे भवितव्य अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच त्यांची सेवा थांबवली जाऊ शकते. सायबर पोलिसांचे पथक सतत तांत्रिक पुरावे गोळा करत आहे. डेटा विश्लेषणाद्वारे हळूहळू संपूर्ण षड्यंत्र समोर येत आहे. शालार्थ प्रणालीतील तांत्रिक मर्यादा, प्रशासकीय दुर्लक्ष आणि कर्मचाऱ्यांची अनियमितता यामुळे नागपूरच्या शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!