महाराष्ट्र

Navneet Rana : दिल्लीच्या गादीवर पाकिस्तानचा बाप बसलाय

Operation Sindoor : मोदी म्हणाले होते रूह थरथर कापेल, झालंही तसंच

Author

भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार कौतुक करत पाकिस्तानला थेट इशारा दिला.

पहलगाममधील भयानक दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरले होते. पाकिस्तानच्या या कायरतापूर्ण हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाचं वादळ उसळले आहे. देशभरात नागरिकांनी केंद्र सरकारकडे आता बदला घ्या अशी जोरदार मागणी करत आहेत. बिहार दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तीव्र शब्दांत या हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानला थेट इशारा दिला. या वेळी त्यांची रूह सुद्धा थरथर कापेल, असा दम भरत त्यांनी कारवाईचे संकेत दिले होते.

अखेर 7 एप्रिल 2025 रोजी पहाटे आशेची किरण उजळली. भारतीय वायुदलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POJK) नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करत ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं. या धडक कारवाईने जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांना जबर धक्का बसला. विशेष म्हणजे, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानचं एफ-16 फायटर जेट देखील जमिनीवर पाडलं. या कारवाईनंतर देशभरात आनंदोत्सव सुरू झाला. सामान्य नागरिकांपासून ते अनेक सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनी मोदी सरकार आणि भारतीय सैन्याचं जोरदार अभिनंदन केलं.

Sunil Mendhe : अवकाळी पावसात घुटमळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुढाकार

छोट्या पाकिस्तानला चेतावणी

सोशल मीडियावर भारत माता की जय, जय हिंद अशा घोषणा आणि पोस्ट्सचा अक्षरशः पूर आला. या हल्ल्याने संपूर्ण राजकारणही ढवळून निघाले आहे. भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी पाकिस्तानवर अत्यंत कठोर आणि थेट भाषेत निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं, ‘घर में घुसकर मारा है, कब्र तुम्हारी खोदी है, देश के दिल्ली के गद्दी पर, बाप बैठा तुम्हारा मोदी है’. त्यांचा या शैलीतला इशारा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पुढे बोलताना राणा म्हणाल्या, ‘क्या बोलते छोटे पाकिस्तान? बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी? चुन चुन कर मारेंगे’.

नवनीत राणा यांनी स्पष्ट इशारा दिला की, आता प्रत्येक दहशतवाद्याचा हिशोब घेतला जाईल. ही लढाई केवळ शस्त्रांनीच नव्हे, तर ठोस कृतीद्वारे लढली जाणार आहे. पूर्वीच्या एका भाषणातही नवनीत राणा यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता की, बाबरीच्या विटेबाबत कोणतंही स्वप्न बाळगू नये. त्या म्हणाल्या होत्या, तुमचा बाप हिंदुस्थानात बसलेला आहे. बाबरीची वीट ठेवायची म्हणाल, तर आम्ही ती डोळ्यांनी पाहून, डोळेच बाहेर काढू.  या सैनिकी कारवाईनंतर विरोधकांनीही सरकारच्या या निर्णायक पावलांचं समर्थन केलं आहे. देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर साऱ्या राजकीय पक्षांनी एकसंघ भूमिका घेतली आहे.

Parinay Fuke : गोंदियाच्या विकासात नव्या प्रकाशाची भर

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!