
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नेहमीच आक्रमक असणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन छेडले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले, शासकीय दारे ठोठावली, आंदोलने केली पण आजही अनेकांना त्यांच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे. याच प्रश्नावर आता प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू नेहमीच आक्रमक भूमिकेत आले आहेत. बच्चू कडू यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. जर शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि अपंगांना मिळणाऱ्या मानधनात वाढ केली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.

सरकारच्या दुर्लक्षामुळे कडू यांनी आता डीसीएम टू सीएम नावाच्या अनोख्या आंदोलनाची घोषणा केली आहे. ज्याची सुरुवात बारामतीतून होणार असून शेवट नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळ होईल. 2 जून रोजी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर कडू अर्थसंकल्प वाचन आंदोलन करणार आहेत. यातून सरकारला जाब विचारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी किती पैसा दिला गेला, आणि प्रत्यक्षात किती मिळाला? या माध्यमातून कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणण्याचा प्रहार पक्षाचा प्रयत्न आहे. कडू म्हणाले, शेतकऱ्यांचे खाते पुन्हा एकदा शून्य झाले पाहिजे.
सरकारच्या निष्क्रियतेवर प्रहार
हीच खरी कर्जमाफी असेल. प्रहार जनशक्ती पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि अपंगांना मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी नागपुरात रक्तदान मोहीम करण्यात आले. 14 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानाजवळ हे आंदोलन करण्यात आले. ज्यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचे खाते पुन्हा रिकामे करण्याची मागणी केली. कडू पुढे म्हणाले की, 3 जून रोजी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले जाईल, तसेच सर्व मंत्र्यांच्या निवासस्थानी हे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मागण्या पूर्ण न झाल्यास, ७ जूनपासून मोझारीत उपोषण सुरू करण्याचा इशाराही कडू यांनी दिला आहे.
यातून सरकारला सूचित करण्यात आलं की, लोक आता स्वतःचं रक्त सांडायला तयार आहेत, पण शेतकऱ्यांचे हक्क मिळालेच पाहिजेत. कडू यांनी 7 जूनपासून यवतमाळ जिल्ह्यातील मोझारी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशाराही दिला आहे. आता शब्द चालणार नाहीत, कृती हवी अशा शब्दांत कडूंनी सरकारला चेतावणी दिली आहे. या आंदोलनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही कडू यांनी घणाघाती टीका केली आहे. राज्याचा अर्थसंकल्प वाढत चालला, पण शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. हे दुर्दैव आहे, असे कडू म्हणाले. डीसीएम टू सीएम हे आंदोलन केवळ कर्जमाफीसाठीच नव्हे, तर सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार प्रहार करण्यासाठीही आहे. बच्चू कडूंचा हा लढा नेहमीप्रमाणे थेट आणि धडक आहे.