प्रशासन

Akola : रेल्वेच्या छायेत अंमली पदार्थांचा व्यवहार

Drugs Raid : शाळेच्या पायरीवर नशेचा व्यापार

Author

अकोला शहरात अंमली पदार्थांची वाढती तस्करी चिंतेची बाब ठरत असून, अकोला ट्रांजिट पॉईंट बनत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

अकोल्याचे नाव सध्या चिंतेच्या कारणांमुळे चर्चेत येत आहे. शहराच्या मध्यवर्ती रचनेचा गैरफायदा घेत काहींनी अंमली पदार्थांची तस्करी कारभार म्हणून सुरू  केला आहे का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अंमली पदार्थांची खुलेआम विक्री होणाऱ्या अकोल्यात स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत १६ किलो गांजासह तिघा तरुणांना गजाआड केले आहे. यामुळे अंमली पदार्थांचा सुळसुळाट अकोल्यात वाढत चालल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शहरातील अनेक भागांत ही अवैध तस्करी बिनधास्त सुरू आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब असून, पोलिसांसमोर आता मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

अंमली पदार्थांच्या या अवैध जाळ्याला छेद देण्यासाठी रामदास पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने सखोल तपास करून मोठी कारवाई केली आहे.स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काही तरुण गांजा विक्रीसाठी रेल्वे स्थानक मार्गे रामदासपेठेतील सेमी इंग्रजी शाळेजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करत तीन संशयित तरुणांना बादल लाला कांबळे, सुनील द्वारकाप्रसाद यादव आणि रोशन भास्कर सोनोने यांना अटक केली. त्यांच्या जवळील बॅगमध्ये एकूण 16 किलो गांजा आढळून आला, ज्याची बाजारातील किंमत अंदाजे 3 लाख 20 हजार रुपये इतकी आहे.

Sanjay Rathod : यवतमाळत पालकमंत्र्यांचा संतापस्फोट 

तपासाची गरज वाढली

पोलिसांनी या आरोपींकडून तीन विविध कंपन्यांचे मोबाईल जप्त केले आहेत. त्यांची एकूण किंमत 30 हजार रुपये आहे. मिळालेल्या मुद्देमालाची एकत्रित किंमत जवळपास 3 लाख 50 हजार रुपये आहे. आरोपींवर एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना पुढील तपासासाठी रामदासपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.अकोला शहर हे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने अनेक रेल्वे मार्ग अकोल्यावरून जातात. तसेच, जिल्ह्याच्या सीमा मध्य प्रदेश राज्याशी जोडलेल्या असल्याने अंमली पदार्थांची वाहतूक अकोल्यातून केल्याचा संशय अधिक बळावतो आहे.

विशेषतः रेल्वेमार्गाचा वापर करून इतर राज्यांमध्ये गांजाची तस्करी केली जात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिशेने देखील सखोल चौकशीची गरज निर्माण झाली आहे.ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक बच्चन सिंह आणि अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक विजय चव्हाण, उपनिरीक्षक गोपाल जाधव, माजीद, सहाय्यक उपनिरीक्षक राजपालसिंह ठाकुर यांच्यासह पोलीस कर्मचारी उमेश पराये, खुशाल नेमाडे, धीरज वानखडे, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर, चालक विनोद ठाकरे आणि अक्षय बोबडे यांनी परिश्रम घेतले.

Devendra Fadnavis : गोरेवाडाच्या कुशीत निसर्गाची नवी गाथा

अकोल्यात सुरू असलेल्या या अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या घटनांवर आक्रमक आणि सातत्यपूर्ण कारवाया करत रहायला हवे, अन्यथा अकोल्याचे नाव गांजा मार्केट म्हणून ओळखले जाण्याची भीती नाकारता येत नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!