महाराष्ट्र

Nagpur : पोलिसांनी ऑपरेशन थंडर करून माफीयांना केलं थंड

Operation Thunder : पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांचं नेतृत्व; गुन्हेगारांची हादरली दुनिया  

Author

नागपुरात सायंकाळच्या शांततेत अचानक पोलिसांची वीज चमकली, ‘ऑपरेशन थंडर’ सुरू झालं होतं. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली एक गुप्त मोहिम शहरातील काळसर व्यापारावर कोसळली.

एका वेगळ्या संध्याकाळी, नागपूर शहराच्या हवेत काहीतरी बदलले होते. एरवी संथतेने वाहणाऱ्या सायंकाळच्या वेळेला यावेळी वेग, गुप्तता आणि शिस्तीचा स्पर्श होता. पोलिसांचे वाहनांचे टायर नागपूरच्या रस्त्यांवर वळवळ करत होते. एका योजनेचा भाग म्हणून जे शहराच्या आरोग्यावर बिंबलेली निकोटीनची काजळी साफ करणार होते. ‘ऑपरेशन थंडर’ या नावाने सुरू झालेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ‘मिशन AXE’ नावाने पोलिसांनी जी धडक कारवाई केली, ती नागपूरच्या इतिहासात कायमच्या ठसा उमटवून गेली.

कारवाईचे सूत्रधार, नागपूर शहराचे कणखर पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी अत्यंत ठाम निर्णय घेतला. ‘वेप सप्लाय’मार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शहरात ई-सिगारेट, हुक्का फ्लेवर, निकोटीन लिक्विड्स यांचा बेकायदेशीर साठा आणि खुलेआम विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती ऐकताच त्यांनी तिची गांभीर्याने दखल घेतली आणि समाजाच्या आरोग्याला विळखा घालणाऱ्या या अंधाऱ्या जाळ्याला चिरडण्याचा निर्णय घेतला.

धडक कारवाई

पोलिस आयुक्त सिंगल यांनी एनडीपीएस शाखा, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि विशिष्ट पथकांशी गोपनीय बैठक घेत, मिशन AXE चे नियोजन अत्यंत काटेकोरपणे केले. या मोहिमेसाठी शहरातील 17 ठिकाणांची निवड करण्यात आली, परंतु प्रत्येक ठिकाणाच्या कारवाईसाठी पथकांना केवळ काही मिनिटांपूर्वीच माहिती देण्यात आली. त्यामुळे कोणतीही माहिती गुप्त ठेवण्यात यश मिळाले.

Akola : वर्दीतला विषारी धूर, अर्चित चांडक यांनी फुंकर घालून विझवला

27 मे 2025 रोजी संध्याकाळी सहाच्या ठोक्याला, एकाचवेळी 16 ठिकाणी 150 पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी धाडसी छापे घातले. टेक्सास स्मोक शॉपची 13 केंद्रे, एक गोडाऊन आणि काही पान दुकानांवर हे धाडसत्र राबवण्यात आले. झेंडा चौक, मानेवाडा, वाठोडा, बर्डी, अजनी, एमआयडीसी, प्रतापनगर, सक्करदरा, गिट्टीखदान, लकडगंज, हुडकेश्वर अशा विविध भागांमध्ये कारवाई करण्यात आली. जिथे कायद्याचे नाव घेऊन लोक डोळे चुकवत होते, तिथे पोलिसांनी प्रत्यक्ष हजर राहून धाडसी कारवाई केली.

लाखोंचा माल जप्त

कारवाईत एकूण 43 लाख 37 हजार 448 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यात ई-सिगारेट्स, हुक्का पॉट्स, तंबाखूजन्य फ्लेवर, डीव्हीआर यंत्रणा, मोबाईल फोन्स, रोख रक्कम आणि मोपेड यांचा समावेश होता. आरोपींच्या मोबाईलमध्ये संशयास्पद फाटलेल्या नोटांचे फोटो सापडले असून त्यांचा पेमेंटसाठी वापर होत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आशिष उर्फ अंकुश अमृतलाल शाहू याने शहरात ‘टेक्सास स्मोक शॉप’च्या नावाने फ्रँचायझी सुरू करून मोठा बेकायदेशीर साखळदंड उभा केला होता.

कारवाई केवळ कारवाई म्हणून नाही, तर ही होती सामाजिक जबाबदारीची जाणीव. पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी सांगितले की, ई-सिगारेटमधील निकोटीन तरुणांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे. चिंता, अनिद्रा, चिडचिड, थकवा आणि स्मरणशक्ती कमी होणे याचे परिणाम फक्त वैयक्तिक नव्हे, तर कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरही दीर्घकालीन दुष्परिणाम घडवू शकतात.

Pravin Datke : धागा धाग्याने गुंफला संघर्ष, अखेर न्यायाची वीण बसली

धाडसी पाऊल

संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व करताना पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी फक्त धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत, तर प्रत्येक पथकाच्या नियोजनात स्वतः गुंतले. त्यांना सहकार्य केले सह पोलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त राहुल माखणीकर, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. अभिजीत पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमोल देशमुख, संदीप बुवा, ओमप्रकाश सोनटक्के, नाईकवाडे आणि अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख गजानन गुल्हाने यांनी. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे संपूर्ण मोहिम अचूक आणि प्रभावीपणे पार पडली.

ही बातमी केवळ कायदेशीर कार्यवाहीची नसून, ती नागपूर पोलिसांची सामाजिक भान ठेवणारी, तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढणारी, आणि धोकादायक छायांना नष्ट करणारी एक यशोगाथा ठरली आहे. ‘ऑपरेशन थंडर’ हे आता केवळ मोहिमेचे नाव राहिलेले नाही, तर ते नागपूरच्या नागरिकांच्या मनात एक विश्वासाचं वादळ ठरले आहे. सुरक्षिततेचं, आरोग्याचं आणि जागृतीचं.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!