महाराष्ट्र

Nana Patole : वकिलीच्या रंगमंचावर फडणवीस, पण न्यायासन अजूनही मूक 

Devendra Fadnavis : मतांवरून माजी प्रदेशाध्यक्षांचा हल्लाबोल

Author

विधानसभा निवडणुकीतील कथित घोटाळ्यांवरून काँग्रेसने भाजपावर आणि निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधला आहे. नाना पटोले यांनी फडणवीसांवर आयोगाचे वकील असल्याचा टोला लगावत, आयोगानेच उत्तरं द्यावीत, अशी ठाम मागणी केली आहे.

भारतीय लोकशाहीच्या मंचावर सध्या एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेचा जबाबदार कोण? याच प्रश्नाचं उत्तर शोधताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. निवडणूक आयोगाची उत्तरं देण्याऐवजी फडणवीसच त्यांची वकिली का करत आहेत, असा सवाल करत पटोले यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच गंभीर संशय व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपाने बोगस मतदार याद्या तयार करून मतांची चोरी केल्याचा गंभीर आरोप करत नाना पटोले म्हणाले, सत्तेची चव एवढी गोड लागली की मतांचे कडवे सत्य गिळले गेले. पण काँग्रेसने ते पुराव्यानिशी उघड केले आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार केली आहे, पण उत्तर मिळतंय ते फडणवीसांकडून.

मतांची चोरी, मौन आयोगाचं

नाना पटोले यांचा आरोप आहे की, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच काँग्रेसने मतदार याद्यांतील अनियमितता, फर्जी नोंदणी आणि मतदान प्रक्रियेतील छळ याचे ठोस पुरावे सादर केले होते. मात्र, निवडणूक आयोगाकडून समाधानकारक किंवा पारदर्शक स्पष्टीकरण आजतागायत मिळालेले नाही. उलट, मुख्यमंत्री फडणवीस यांचं वर्तन आयोगाच्या प्रवक्त्याप्रमाणे आहे, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला काही थेट व मुद्देसूद प्रश्न विचारले. हे आरोप नाहीत, तर संवैधानिक चौकशीची मागणी आहे, असे सांगत नाना पटोले यांनी भाजपावर हल्ला चढवला. “भारत जोडो’चा आवाज राहुल गांधी देशभरात पोहचवत असताना, भाजपा मात्र ‘भारत तोडो’ची भाषा बोलते. एकता नव्हे, विघटन हेच त्यांचं राजकारण आहे, असा घणाघात त्यांनी केला.

Akola : शिवसैनिकांमध्ये संभ्रम नाही, निर्णय एकनाथ शिंदेंच्या आदेशानेच

विचारसरणीची लढाई 

देवेंद्र फडणवीसांनी ‘भारत जोडो यात्रा’वर टीका करताना दिलेलं वक्तव्य ‘बटेंगे तो कटेंगे’, हेच भाजपाच्या मानसिकतेचं स्पष्ट दर्शन घडवतं, असं नाना पटोले म्हणाले. फडणवीसांनी आत्मपरीक्षण करावं. ‘एक है तो सेफ है’ म्हणणाऱ्या विचारसरणीने देशाला काय दिलं? असा प्रत्ययकारी सवाल त्यांनी उपस्थित केला. नाना पटोले यांनी केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली.

2014 पासून सर्व स्वायत्त संस्था भाजपा सरकारच्या ताब्यात गेल्या आहेत. न्याय, निवडणूक, चौकशी सगळं एका रिमोटवर चालतं. हा रिमोट जनतेच्या हातात नाही, फक्त एका पक्षाच्या हातात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री असाल म्हणून सगळ्यांची बाजू बोलायची का जबाबदारी तुमची आहे? निवडणूक आयोग स्वतः सक्षम आहे का नाही? त्यांना बोलू द्या. तुमचं वकील म्हणून काम करणं हा लोकशाहीचा अपमान आहे. अशा थेट शब्दांत नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!