सुमारे तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या जमिनीवर न्यायाचं पीक उगवलंय. भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या लढ्यामुळं अन्यायाचं सावट हटलं. भंडाऱ्यातील बळीराजाला आत्मसन्मान परत मिळाला आहे.
भंडाऱ्याच्या राजकारणात एक असा नेता आहे, जो केवळ सत्तेचा वापर केवळ लोकहितासाठी करतो. हे नाव आहे भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. आता हे केवळ राजकारणातच नव्हे तर समाजकारणातही सन्मानाने घेतलं जातं. त्यांच्या नेतृत्वात जो आवाज उठतो, तो केवळ भाषणापुरता मर्यादित राहत नाही. मंत्रालयाच्या दारापर्यंत पोहोचतो आणि प्रश्न सुटतो. लोकांना न्याय मिळतो. या न्यायाचं ताजं उदाहरण म्हणजे साकोली तालुक्यातील मुंडीपार, खैरी आणि ब्राह्मणी या गावांतील शेतकऱ्यांना मिळालेला विजय.
गेल्या 13 वर्षांपूर्वी या गावांतील शेतकऱ्यांनी भेल (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड) प्रकल्पासाठी सरकारकडे आपली सुपीक जमीन दिली होती. प्रशासनानं मोठमोठी स्वप्नं दाखवली. उद्योग, नोकऱ्या, विकास. पण वर्षं सरत गेली. सरकारं बदलली. आश्वासनं धूसर झाली आणि या शेतकऱ्यांच्या पदरात राहिलं ते केवळ अन्यायाचं काळं सावट. ना प्रकल्प उभा राहिला, ना नोकऱ्या मिळाल्या. मिळाली ती फक्त निष्क्रियता आणि उद्विग्नता.
सतत पाठपुरावा
डॉ. परिणय फुके यांनी या प्रकरणाकडे जातीनं लक्ष दिलं. या मागे केवळ राजकीय हेतू नव्हता. काळ्या मातीतू सोन्यासारखं पीक उगवणाऱ्या बळीराजाच्या आयुष्याचा तो प्रश्न होता. त्यामुळे डॉ. फुके यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील व्यथेचे पाणी ओळखलं. मंत्रालयात त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत विशेष बैठक घेतल. मुंबई व दिल्लीमध्ये अधिकाऱ्यांच्या चर्चा घडवून आणली. जेव्हा काहीजण प्रकल्प दुसरीकडे वळवण्याचे प्रयत्न करत होते, तेव्हा डॉ. फुके यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका घेतली. ‘भंडाऱ्याच्या शेतकऱ्यांचा हक्क कुणीही हिरावू शकत नाही.’ आमदार डॉ. फुके यांनी सिद्ध केले की, प्रयत्नांना नक्कीच यश मिळतं.
डॉ. फुके यांच्या सातत्यपूर्ण लढ्याला अखेर यश मिळालं. सरकारनं जमिनी परत देण्याचा निर्णय घेतला. मात्र हे यश केवळ मालमत्तेचं नव्हतं. हे यश होतं आत्मसन्मानाच्या पुनर्स्थापनेचं. आता डॉ. फुके यांच्या अथक प्रयत्नांमुळे 13 वर्षांनी शेतकरी पुन्हा आपल्या जमिनीकडे पाहून म्हणू लागले आहेत, ही माती आमची आहे, आमच्यासाठी आहे.
मातीशी जुळली नाळ
शेतकऱ्यांच्या या ऐतिहासिक विजयाच्या दिवशी आमदार डॉ. फुके स्वतः शेतकऱ्यांच्या जमिनीवर गेले. त्यांनी हातात नांगर घेतला. बी-बियाणं पेरलं. जमिनीवर पाय असलेल्या या नेत्यानं आपल्यातील कष्टकरी जागा केला. अनेक वर्षांपासून ओसाड पडलेल्या जमिनीत नव्या रोपट्याचं बिजारोपण झालं. हे दृश्यच सांगत होतं की, नेता तोच, जो लोकांच्या दु:खात त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहतो. लोकनेता तोच जो फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतूनही नवा जन्म घेण्याची उमेद दाखवतो. शेताची जमीन हाती पडल्यानंतर बळीराजाच्या डोळ्यात आजही अश्रू होते. पण हे अश्रू आनंदाचे होते. समाधानाचे होते.
आमदार डॉ. फुके यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं की, हा लढा जमिनीसाठी नव्हता. हा लढा त्या जमिनीवर जगणाऱ्या माणसांच्या अस्तित्वासाठी होता. या एका वाक्यात त्यांच्या संघर्षाचा, प्रयत्नांचा, आणि नेतृत्वाचा सारांश आहे. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क परत मिळाल्यानं संपूर्ण परिसरात आनंदोत्सव आहे. शेतकऱ्यांचे चेहरे फुलले आहेत. गावात उत्सवाचं स्वरूप आहे. तेरा वर्षांच्या काळोखाचा अंत झाला आहे. नवी पहाट उगवली आहे. न्यायाचा दिवस उजाडला आहे.
Mohan Bhagwat : जातीभेद विसरून एक समरस राष्ट्र बांधण्याची गरज