महाराष्ट्र

Mahayuti : वाघ – बिबट्यांच्या वाटेवर आता सौरशक्तीचा पहारेकरी 

Chandrashekhar Bawankule : बफरच्या मातीला मिळणार नवा अर्थ 

Post View : 18

Author

वन्यजीव आणि माणसातील संघर्ष आता गंभीर वळणावर आला असताना, राज्य सरकारने त्यावर अभिनव उपाय शोधला आहे. बफर झोनमधील जमिनी शेतकऱ्यांकडून भाड्याने घेऊन त्यावर सौर प्रकल्प व बांबू लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे.

सतत वाढणाऱ्या मानव आणि वन्य प्राण्यांमधील संघर्ष आता धोका बनला आहे. वाघ, बिबटेच नव्हे तर आता जंगली हत्तींचीही गावशिवारांतील धडक चिंता वाढवत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक नवीन मार्ग शोधला आहे. बफर झोनमधील जमीन शेतकऱ्यांकडून भाड्याने घेऊन ती सौर ऊर्जा आणि हरित पट्ट्याच्या रूपात विकसित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे. यामुळे एकीकडे वन्यजीवांना नैसर्गिक अधिवास मिळेल, तर दुसरीकडे शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा होणार आहे.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती माध्यमांशी बोलताना दिली. त्यांनी स्पष्ट केले की, बफर झोनमध्ये येणारी शेतजमीन शेतकऱ्यांकडून 50 हजार रुपये प्रति एकर दराने भाड्याने घेतली जाणार आहे. योजनेअंतर्गत या जमिनींवर मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेतून सोलर प्लांट बसवण्यात येतील, तसेच बांबूची लागवड करून ग्रासलँड डेव्हलप केले जाईल. या उपक्रमामुळे वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास तयार होईल. शिकार किंवा अपघातामुळे शेतकरी किंवा शेतमजुरांचा जीव धोक्यात येणार नाही. मानव-वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात कमी होईल,” असे बावनकुळे यांनी सांगितले.

शेतीला आर्थिक संजीवनी

सदर योजनेमुळे शेतकऱ्यांना नुसता जमीनभाड्याचा फायदा नाही, तर त्यांच्या जमिनी सुरक्षित राहतील. तसेच वन्यप्राण्यांचे हालचालीचे क्षेत्र निश्चित झाल्यामुळे गावांमध्ये त्यांची आकस्मिक घुसखोरीही टळेल. हे एक शाश्वत आणि समन्वयवादी मॉडेल ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. या योजनेसाठी लवकरच शासन निर्णय (GR) प्रसिद्ध होणार असून, राज्य सरकारने या संदर्भात तयारी सुरू केली आहे. सर्व बफर झोनमधील जमिनींचा सर्वेक्षण करून त्यांचा वापर या उपक्रमासाठी करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Indigo Airlines : बॉम्बच्या सावटाखालील विमान आकाशातून नागपूरच्या जमिनीवर 

राजकीय प्रवेशावर दिलं उत्तर

दरम्यान, सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता, बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितले की, या संदर्भात माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. स्थानिक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांचे एकमत नसेल, तर पक्षप्रवेश होत नाही. त्यांनी सूचकपणे नमूद केले की, नाशिकमध्ये बडगुजर यांच्याविषयी काही विरोध आहे, त्यामुळे त्यांच्या प्रवेशावर अजून निर्णय झालेला नाही. तसेच बबनराव घोलप यांच्या प्रवेशाबाबतही माझ्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बफर झोनमध्ये भाड्याने जमीन घेऊन सौर ऊर्जा आणि पर्यावरणपूरक लागवडीच्या माध्यमातून मानव आणि वन्यजीव संघर्षावर उपाय शोधण्याचा हा उपक्रम, महाराष्ट्रात पहिलाच आणि वेगळा प्रयोग ठरतोय. महसूल मंत्रालय आणि वन विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून विकास आणि संवर्धन यांचा योग्य मेळ साधला जाणार आहे, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!