महाराष्ट्र

Nitin Gadkari : महापालिका निवडणुकीत संघभूमीवर ‘कमळा’चं वर्चस्व अबाधित

NMC Election : विकासाच्या रस्त्यांवरून सत्ता परतवणार भाजप

Post View : 38

Author

राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागली असतांना उपराजधानीत भाजपचा बालेकिल्ला अबाधित राहील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींची चाहूल लागली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकले असून निवडणुकीच्या मैदानात सज्जतेने उतरायला सुरुवात केली आहे. विदर्भाच्या राजकारणात वर्चस्व गाजवणारा नागपूर जिल्हा या लढतीचं प्रमुख रणांगण ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागपूर महापालिकेवर भाजपची निर्विवाद सत्ता आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सत्ता राखेल की काँग्रेस किंवा इतर पक्षांना यश मिळेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका विशेष मुलाखतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या आगामी निवडणूक यशाबाबत आपली भाकीतं मांडली आहेत. सुरेश भट सभागृहात झालेल्या या मुलाखतीत गडकरींची मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या कामगिरीवर आधारित ‘खास’ मुलाखत झाली. याचवेळी नागपूर महापालिकेच्या निवडणुकीवरही सविस्तर चर्चा झाली.या मुलाखतीत गडकरींनी मागील निवडणुकीत भाजपला मिळालेल्या 108 जागांचा उल्लेख करत सांगितले की, गेल्या पाच वर्षांत नागपूर शहरात झालेल्या विकास कामांमुळे यंदा त्याहूनही अधिक जागा मिळतील.

Prashant Padole : ओव्हर ब्रिजच्या निकृष्ट कामांवर खासदाराची सर्जिकल स्ट्राइक

शहरातील विकास कामगिरी

शहरात पाणी, वीज, रस्ते या बाबतीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्याने नागरिक समाधानी आहेत. मागील पाच वर्षांत एकही मोर्चा निघालेला नाही, हीच जनतेची सहमती आणि समाधान दर्शवते, असे गडकरी म्हणाले.राजकीय नेत्यांचा भाजपमध्ये होत असलेला प्रवेश पाहता विचारलेल्या ‘मोर्चे कोण काढणार?’ या प्रश्नावर गडकरींनी दिलेला प्रतिसाद विशेष गमतीशीर ठरला. सुंदर मुलीवर 100 मुले प्रेम करतात, तसंच चांगल्या पक्षावर चांगले लोक प्रेम करतात. म्हणून भाजपमध्ये अनेक सज्जन, समर्थ लोक सामील होत आहेत, असं गडकरी म्हणाले.

गडकरींच्या या वक्तव्यानं सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.गडकरींनी नागरिकांच्या टोलविषयक तक्रारींचाही उल्लेख केला. टोल माफ करण्याची मागणी सारखी ऐकू येते, पण चांगले रस्ते टिकवण्यासाठी निधी लागतोच. मात्र, आता वर्षभरासाठी फक्त  3 हजार देऊन 200 टोल नाक्यांवर विनाशुल्क प्रवास करता येणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांचा खर्च वाचेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.राजकीय जीवनात आलेल्या संघर्षाच्या आठवणीही त्यांनी यावेळी शेअर केल्या. भाजपच्या सुरुवातीच्या दिवसांत लोकांनी त्यांना मत मागताना दगडही मारले होते, असं गडकरींनी सांगितले.

Operation Thunder : मारुती स्विफ्ट मध्ये स्मगलिंगचा स्पीड ब्रेकर

गडकरी पुढे म्हणाले, त्याच काळात काँग्रेसचे नेते श्रीकांत जिचकार यांनी त्यांना काँग्रेसमध्ये यायचं आमंत्रण दिलं होतं. मात्र, मी मेलो तरी चालेल पण भाजप सोडणार नाही, असं ठाम उत्तर गडकरींनी त्यांना दिलं होतं. याच जिद्दीमुळे आज भाजपला नागपुरात यशाचं दिवस पाहायला मिळत आहे, असंही ते म्हणाले.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!