महाराष्ट्र

Abhijit Wanjarri : नुकसान भरपाईच्या पंचनाम्यांवर शंकेची सावली?

Maharashtra : पावसाळी अधिवेशनात शेतकरी मुद्द्यावर उठला वादाचा भंवर

Author

पूर्व विदर्भातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत नागपूरचे काँग्रेस नेते अभिजीत वंजारी यांनी विधान परिषदेत पंचनाम्यांच्या अकार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केला.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. विशेषतः पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अनपेक्षित मुसळधार पावसामुळे अनेक गावांत शेतीचे पीक नाश पावले आहे. पंचनाम्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 30 जुलैपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर काँग्रेसचे नेते अभिजीत वंजारी यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करत नुकसान भरपाईसाठी पंचनाम्यांचा योग्य प्रकारे आणि वेळेवर काटेकोरपणे होणे गरजेचे असल्याचे नोंदवले आहे.

वंजारी यांनी नागपूर विभागातील एप्रिल आणि मे महिन्याच्या आकडेवारीसह वर्धा, गडचिरोली, भंडारा, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील 63 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना झालेल्या प्रचंड आर्थिक तोट्याचा मुद्दा उपस्थित केला.वंजारी म्हणाले की, अनेक शेतकऱ्यांनी पंचनामे झाल्यानंतरदेखील तहसीलदारांकडे आपले नुकसान नोंदवले आहे. त्यांचा पंचनामा अजूनही झालेला नाही. शेतीचे नुकसान आणि जनावरांचे मृत्यू यांचा समावेश असलेल्या घटनांबाबत योग्य पंचनामे न झाल्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यात अडचणी येत आहेत. ते म्हणाले की, पंचनामे योग्य पद्धतीने आणि वेळेवर न होण्यामुळे काही नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईच्या बाहेर पडत आहेत. ज्यामुळे त्यांचे आर्थिक संकट वाढत आहे.

Parinay Fuke : दादांच्या मनामध्ये जय जिनेंद्र?

राजकारण शेतकरी केंद्रित

शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत अधिक तपासणी आणि पंचनाम्यांच्या पुनर्मूल्यांकनाची गरज असल्याचे वंजारी यांनी स्पष्ट केले. त्यांनी सरकारला आवाहन केले की, दहा-पंधरा दिवस उलटूनही होणाऱ्या पंचनाम्यांच्या विलंबामुळे शेतकऱ्यांचा भयंकर त्रास होत आहे. त्यावर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.वंजारी म्हणाले की, यंदा पावसाळ्याच्या महाराष्ट्रात वेळेच्या आधीच हजेरी लावली आहे. हा वादळ महाराष्ट्रात इतर भागांपेक्षा खूप लवकर आल्याने त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा वेगळा अहवाल तयार करावा लागेल. मात्र, त्यांनी विशेषतः एप्रिल महिन्याच्या महापूर विभागातील शेतकऱ्यांचे पंचनामे अजूनही न झाल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.

पुढे त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, शासन त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार की नाही? गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या विषयाने राज्यात राजकारणाला वेग दिला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनाचे वारे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नाभोवतीच फिरताना दिसत आहेत. लोकशाहीच्या या मंदिरात शेतकरी हेच मुख्य मुद्दा बनून उभा राहिला असून, त्यावर झालेली चर्चा आणि वादळे राजकारणाच्या रंगभूमीवर भरभरून पाहायला मिळत आहेत.विधिमंडळाच्या सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून प्रचंड वादळ उफाळल्याचे पाहायला मिळाले.

Nana Patole : राजदंडापुढे घोषणा महागात; सभागृहातून दिवसभरासाठी निलंबित

काँग्रेस नेते तथा आमदार नाना पटोले यांनी या मुद्द्यावर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहात तापलेल्या वातावरणाने तुफान गडावर निर्माण केला. या आक्रमक वर्तनामुळे त्यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले. त्यामुळे यंदाचे पावसाळी अधिवेशन राजकारणाच्या तणावपूर्ण आणि वादग्रस्त रंगभूमीवर रंगणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!