
विकासाची गाडी रखडली होती, पण आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या धडाडीमुळे ती पुन्हा रुळावर येऊ लागली आहे. मुल शहरासाठी बहुप्रतिक्षित बस आगार प्रकल्पाला आता मंत्रालयात निर्णायक गती मिळणार आहे.
मुल शहराच्या भविष्याचा संग्राम कधीच थांबलेला नाही. परंतु, हे भविष्य दिशा पावलंय त्या एका आवाजावर, माजी वने, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कटाक्ष नेतृत्वावर. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने आणि विकासाची अखंड ध्यासाने आता मुल शहरासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले जात आहे. बस आगार प्रकल्पाला अखेर ग्रीन सिग्नल मिळण्याच्या उंबरठ्यावर तो उभा आहे.
राज्याच्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 7 जुलै रोजी दुपारी 2 : 30 वाजता मंत्रालयात विशेष बैठक घेण्याचे निर्देश दिले आहे. या बैठकीत मुल शहरातील बस आगाराच्या अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. या बैठकीस स्वतः आमदार सुधीर मुनगंटीवार प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या समवेत एमएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक, मुंबईतील संबंधित अधिकारी, आणि जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी देखील सहभागी होणार आहेत.

Raj – Uddhav Allience : एक मराठीपणाचा वीर, दुसरा सत्तेचा गंभीर
रखडलेली स्वप्नं आता उधाणावर
मुल शहरासाठी बस आगार मंजूर असून, नगरपरिषदेकडून जागा आरक्षित देखील आहे. जागेची पाहणी पूर्ण झाली असतानाही, कार्यवाहीला सरकारस्तरावर विलंब होत होता. पण या अडथळ्यांना बाजूला सारत, मुनगंटीवार यांनी घेतलेला हा संघर्ष आता फलद्रूप होण्याच्या मार्गावर आहे. हा केवळ बस आगार नाही, तर तो आहे, प्रत्येक ग्रामीण नागरिकाचा प्रवास सुलभ करण्याचा स्वाभिमानी प्रयत्न.
सुधीर मुनगंटीवार हे केवळ आमदार नाहीत, तर ते या मातीतल्या प्रत्येक माणसाच्या आशा-आकांक्षांचे प्रतिनिधी आहेत. वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्रीपद भूषवलेले हे नेतृत्व विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर झगडताना दिसते. आजवर त्यांच्या प्रयत्नातून मुल तालुक्यात विविध क्षेत्रांमध्ये क्रांती घडलेली आहे. मग तो शिक्षण असो, पायाभूत सुविधा असोत किंवा पर्यावरणपूरक उपक्रम.
Sunil Mendhe : वैनगंगेच्या पाण्यातून उभा राहिला विकासाचा पूल
विकासदृष्टिकोनाचा मैलाचा दगड
या बैठकीत बस आगारासाठी जागा निश्चित करणे, अंमलबजावणीसाठी रोडमॅप तयार करणे, विविध विभागांमध्ये समन्वय घडवणे आणि संभाव्य अडचणी सोडवण्यावर विशेष चर्चा होणार आहे. या प्रक्रियेला गती मिळाल्यास केवळ मुल नव्हे तर संपूर्ण बल्लारपूर विधानसभेला वाहतूक सुविधा आणि प्रादेशिक विकासाच्या दृष्टीने नवे वळण मिळेल.
सामान्य जनतेच्या गरजा हेच माझे उत्तरदायित्व आहे. मुलसाठी हे बस आगार केवळ एक प्रकल्प नसून, तो माझ्या लोकांप्रती असलेल्या कर्तव्याचा एक भाग आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. हा निर्णय म्हणजे केवळ सरकारी परिपत्रक नव्हे, तर मुनगंटीवार यांच्या धडाडीच्या नेतृत्वाची पोचपावती आहे. राजकारणात पदं येतात-जातात, पण लोकांच्या आयुष्यात परिवर्तन करणारी तीव्र इच्छाशक्ती ही कायम लक्षात राहते आणि तीच इच्छाशक्ती आज बस आगाराच्या रूपाने उभी राहतेय.