महाराष्ट्र

Abhijit Wanjarri : आमदारांनी सांगितली घर नसलेल्या घरकुलांची कहाणी

Monsoon Session : नागपूरच्या गोधनीतील प्लॉट धारकांचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Author

नागपूरच्या गोधनी रेल्वे परिसरातील म्हाडा प्लॉट वाटपाचा वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी विधान परिषदेत ठणकावून मांडला.

राजकारणाचा रिंगण सध्या पावसाळी अधिवेशनाच्या भोवऱ्यात फिरत आहे. अधिवेशनाचा सूर सुरू झाल्यापासूनच विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्याच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या अधिवेशनात आता नागपूरच्या गोधनी भागातील रहिवाशांचे स्वप्नही चर्चेचा विषय ठरले आहे. नागपूर काँग्रेसचे आक्रमक आमदार अभिजित वंजारी यांनी विधानसभेत गोधनी रेल्वे परिसरातील म्हाडा प्लॉट वाटपासंदर्भातील मुद्दा मोठ्या आवाजात मांडला आहे.

नागपुरातील हे प्रकरण केवळ भूखंड वाटपापुरते मर्यादित नसून, एका पिढीच्या आशा-अपेक्षांचा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरसा असल्याचे ते म्हणाले.वर्ष होतं 1996. म्हाडाने गोधनी रेल्वे परिसरात तब्बल 316 नागरिकांना प्लॉट वाटप केले. त्यावेळी लाभार्थ्यांच्या डोळ्यांत घराचे, छताचे, स्वतःच्या आशियानाचे स्वप्न होते. मात्र आज 27 वर्षांनंतरही हे स्वप्न फक्त कागदावरच आहे. आमदार वंजारी म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून मी हा विषय सातत्याने विधानभवनात उपस्थित करतो आहे. पण 316 लाभार्थ्यांपैकी फक्त 103 जणांनाच प्रत्यक्ष ताबा मिळाला आहे. बाकीचे 200 पेक्षा जास्त नागपूरकर अजूनही घराच्या प्रतीक्षेत आहेत.

Devendra Fadnavis : संविधानाला वाचवणारा हात, नक्षलवाद्यांवर कठोर घात

घर हक्कासाठी संघर्ष

घर हक्काचे मिळेल, यासाठी त्यांचा संघर्ष सुरूच आहे. या तगमगत्या कहाणीला शासनाच्या गोंधळलेल्या धोरणांची किनार आहे. गोधनी भाग सध्या नागपूर महापालिकेच्या हद्दीबाहेर असून, नगरपरिषद हद्दीत आहे. येथेच खरी अडचण सुरू होते. नगरपरिषद म्हणते, ‘डेव्हलपमेंट चार्जेस भरलेत का?’ तर म्हाडा म्हणते, ‘विकासकामं पूर्ण झाली कीच ताबा देऊ.’ या चक्रव्यूहात अडकले आहेत ते सामान्य नागरिक. जे काही वर्षांनी म्हातारं होतील, पण घराचं दार कधी उघडणार, याचा पत्ता नाही. अभिजित वंजारी यांनी या मुद्द्यावर ठामपणे सरकारची स्पष्ट भूमिका मागितली.

वंजारी यांनी विधान परिषदेत  विशेष प्रश्न विचारून या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणावर ठोस कारवाईची मागणी केली आहे. ही बाब फक्त कागदोपत्री न राहता, प्रत्यक्ष कृतीत उतरवावी. संबंधित नागरिकांना तातडीने त्यांचा प्लॉट ताब्यात द्यावा, अशी ठाम मागणी अभिजित वंजारी यांनी सभागृहात केली. पावसाळी अधिवेशनाच्या राजकीय वादळात नागपूरच्या सर्वसामान्य नागरिकांचा हक्काचा प्रश्न इतक्या जोरात मांडणं ही वंजारींची राजकीय प्रामाणिकता दर्शवते. जेव्हा एका मुद्द्यावर 27 वर्षं होऊनही तो मार्गी लागत नाही, तेव्हा केवळ व्यवस्थेची मर्यादा नव्हे तर तिची असंवेदनशीलताही उघड होते.

Parinay Fuke : भंडाऱ्याच्या विकासासाठी आमदार पोहोचले परिवहन मंत्र्यांच्या दरबारी

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!