महाराष्ट्र

Ujjwal Nikam : ज्यांनी कसाबला फाशी दिली, तेच आता संसदेत आवाज उठवणार

Rajya Sabha : उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर दमदार एन्ट्री

Author

26/11 मधील कसाबला फाशी देणारे खंदे सरकारी वकील उज्ज्वल निकम आता राज्यसभेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या नावाची नामनिर्देशित सदस्य म्हणून घोषणा केली आहे.

देशाच्या न्याय व्यवस्थेत आपल्या प्रभावी युक्तिवादाने थरकाप उडवणारे, दहशतवादी अजमल कसाबला फाशीच्या टोकापर्यंत नेणारे प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम आता विधीमंडळात आपला ठसा उमटवणार आहेत. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची राज्यसभेसाठी थेट नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती केवळ सन्मान नव्हे, तर देशाच्या न्यायव्यवस्थेतील योगदानाचं गौरवच आहे.

उज्ज्वल निकम हे नाव म्हणजे कायद्याच्या व्यासपीठावरचा एक विश्वासाचा चेहरा. कसाबच्या खटल्यापासून ते तेलगी घोटाळा, प्रफुल्ल गुहा, कोपर्डी बलात्कार प्रकरण, बरीचशी हाय प्रोफाईल प्रकरणं त्यांनी आपल्या युक्तिवादातून सरकारच्या बाजूने यशस्वीरित्या लढली. त्यांच्या तळमळीच्या आणि निर्भीड युक्तिवादाने दहशतवादी अजमल कसाबसारख्या क्रूर अपराध्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. आज त्यांचं नाव केवळ कायदेतज्ज्ञ म्हणून नाही, तर राष्ट्रहिताच्या सजग रक्षकांमध्ये घेतलं जातं.

Nitin Gadkari : शिक्षकांच्या नियुक्तीत पैसे दिल्याशिवाय काहीही शक्य नाही

शेकडो खटल्यांमध्ये नेतृत्व

जळगावच्या मातीमध्ये जन्मलेले उज्ज्वल निकम हे विज्ञान शाखेतील पदवीधर असून त्यांनी जळगाव येथील एस.एस. मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या वकिली कारकीर्दीत त्यांनी 600 पेक्षा अधिक गुन्हेगारी खटल्यांमध्ये सरकारी बाजूचे नेतृत्व केलं आहे. राज्यसभेत प्रवेश केल्यानंतर उज्ज्वल निकम आता देशातील महत्त्वाच्या कायदेशीर, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आणि न्यायव्यवस्था सुधारणा यासारख्या विषयांवर ठाम भूमिका घेतील, अशी अपेक्षा आहे. कसाबसारख्या दहशतवाद्याला शिक्षा मिळवून देणारा आवाज आता देशाच्या धोरण निर्मितीत प्रत्यक्ष सहभागी होणार आहे, ही बाब भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत आश्वासक ठरते.

उज्ज्वल निकम यांच्यासह आणखी तीन प्रतिष्ठित व्यक्तींनाही राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे. केरळचे सामाजिक कार्यकर्ते सी. सदानंदन मास्टर, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि इतिहासकार डॉ. मीनाक्षी जैन यांचाही या यादीत समावेश आहे. गृह मंत्रालयाने यासंदर्भातील अधिसूचना शनिवारी जाहीर केली. हर्षवर्धन श्रृंगला हे 1984 बॅचचे परराष्ट्र सेवा अधिकारी असून त्यांनी अमेरिकेसह अनेक महत्त्वाच्या देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे. डॉ. मीनाक्षी जैन या भारतीय इतिहासाच्या पुनर्परिचयासाठी ओळखल्या जातात, तर सदानंदन मास्टर हे शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी झगडणारे कार्यकर्ते म्हणून केरळमध्ये प्रसिद्ध आहेत.

Sanjay Gaikwad : कॅन्टीनच्या वरण भातानंतर, आता कढी-भाताचा राडा

राष्ट्रपतींचा महत्त्वपूर्ण निर्णय

भारतीय संविधानाच्या कलम 80(1)(a)(3) नुसार, राष्ट्रपतींना 12 गुणी व्यक्तींना राज्यसभेत नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे. याच अंतर्गत चार नामनिर्देशित सदस्यांची मुदत संपल्यानंतर त्या रिक्त जागांवर नव्या चेहऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे संसदेत ज्ञान, अनुभव आणि राष्ट्रनिष्ठ दृष्टिकोनाची अधिक सशक्त उपस्थिती दिसून येईल. उज्ज्वल निकम यांची ही नियुक्ती म्हणजे केवळ सन्मान नव्हे, तर एक प्रेरणा आहे. त्यांनी न्यायासाठी चालवलेली अविरत लढाई आता एक नव्या मंचावर सुरू होणार आहे. लोकशाही आणि कायदेसंस्था बळकट करण्यासाठी त्यांचा अनुभव निश्चितच अमूल्य ठरेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!