महाराष्ट्र

Bachchu Kadu : शेतकऱ्यांच्या लढ्याला शिवसेनेचा पाठिंबा

Shiv Sena : भास्कर जाधव यवतमाळ सभेसाठी सज्ज

Author

प्रहार जनशक्ती पक्षाच्या सातबारा कोरा यात्रेला शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ठाम पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे अंबोडा येथील समारोपीय सभेत सहभागी होणार आहेत.

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेल्या सातबारा कोरा कोरा यात्रेला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ठाम आणि कणखर पाठिंबा मिळाला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या पदयात्रेत यापूर्वी मनसेसह विविध घटक सामील झाले होते. आता या संघर्षात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती भास्कर जाधव यांनी थेट सहभाग घेत, शेतकऱ्यांच्या आवाजाला नवी धार दिली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वैचारिक ताकद म्हणून ओळखले जाणारे भास्कर जाधव हे सोमवार, 14 जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील अंबोडा येथे होणाऱ्या समारोपीय सभेला प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे या आंदोलनाला केवळ राजकीयच नव्हे तर वैचारिक वजन मिळाले आहे. शिवसेनेने सुरूवातीपासूनच शेतकरी प्रश्नांवर ठाम भूमिका घेतलेली आहे. या लढ्याच्या निर्णायक टप्प्यावर ठाकरे गटाचे नेतृत्व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते आहे.

Devendra Fadnavis : अर्बन माओवाद्यांचा शहरी शिरकाव उघड

चिलगव्हाणमध्ये सांगता

बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा 7 जुलै रोजी अकोला जिल्ह्यातील पापळ गावातून सुरू झाली. हेच गाव देशाचे माजी कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव आहे. हे स्थान केवळ ऐतिहासिक नव्हे, तर शेतकरी आंदोलनाचे प्रतीक मानले जाते. यात्रेचा शेवट यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या गावात होणार आहे. जिथे महाराष्ट्रातील पहिल्या शेतकरी आत्महत्येची नोंद झाली होती. या 138 किमीच्या संघर्षमय वाटचालीत हजारो शेतकरी, कार्यकर्ते आणि तरुण पावसाची पर्वा न करता सहभागी झाले आहेत. यात्रेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हमीभावाचा अभाव, सावकारीत अडकलेली शेती, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत थांबलेली मने आणि शासनाच्या घोषणांमधून आलेली निराशा यांचा गहिरा स्वर उमटतो आहे. या आवाजाला शिवसेनेचे भास्कर जाधव यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व मिळाल्याने आंदोलनाला निर्णायक वळण लाभण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यात्रेच्या सातव्या दिवशी एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. बच्चू कडू आणि त्यांच्या सोबतचे शेतकरी यांनी डोळ्यांवर काळी पट्टी बांधून अंबोडा दिशेने मोर्चा सुरू ठेवला. ही कृती केवळ एक प्रतिकात्मक घोषणा नव्हे, तर शासनाच्या दुर्लक्षावर तिरकस प्रहार करणारी होती. शेतकरी म्हणतो, शासनाने डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. आम्ही ती पट्टी उतरवण्यासाठी मार्गक्रमण करत आहोत. कर्जमाफी, हमीभाव, बँकांचे नोटीस धोरण, सावकारांचे दडपण, आणि व्यवस्थेची उदासीनता, या सगळ्याच्या विरोधात चाललेली ही पदयात्रा आता केवळ प्रहार जनशक्ती पक्षापुरती मर्यादित राहिलेली नाही. शिवसेना ठाकरे गटाने त्यात उडी घेतल्यानंतर ती शेतकरी प्रश्नांचा एक सशक्त जनआवाज बनून उभी राहत आहे.

Chandrashekhar Bawankule : नागपूर-चंद्रपूरमध्ये माफियांचीच माया

संघर्षाचे केंद्र

भास्कर जाधव हे शिवसेनेतील अनुभवी आणि स्पष्टवक्ते नेते मानले जातात. शेतकरी प्रश्नांवर त्यांनी कायमच अभ्यासपूर्ण आणि थेट भूमिका मांडलेली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे अंबोडा येथील सभा अधिक निर्णायक ठरणार आहे. ही उपस्थिती म्हणजे शेतकऱ्यांच्या संघर्षाच्या भूमिकेला राजकीय अधिष्ठान मिळण्याचं स्पष्ट चिन्ह आहे. यात्रेतील सहभागी शेतकऱ्यांना ठाकरे गटाकडून मिळणारा पाठिंबा केवळ एक प्रतीक नाही, तर त्यातून राजकीय पक्षांची शेतकरीप्रती असलेली बांधिलकी स्पष्ट होते. भास्कर जाधव यांचे भाषण, त्यांच्या उपस्थितीत होणारे निर्णय आणि शेतकऱ्यांप्रती त्यांची नाळ या सभेत ठळकपणे समोर येणार आहेत.

सात दिवसांच्या पायपीटीनंतर आता अंबोडा हे गाव संघर्षाचे केंद्र ठरत आहे. याठिकाणी होणारी सभा केवळ एक औपचारिक कार्यक्रम न राहता ती राज्यातील शेतकरी आंदोलनाला दिशा देणारी ठरणार आहे. यात मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन राजकीय शक्तींचा एकत्रित पाठिंबा म्हणजे राज्य सरकारला दिलेला एक स्पष्ट इशारा ठरतो. या सगळ्या घडामोडींनी सातबारा कोरा यात्रा’ शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी उभा राहिलेला एक दृढ निर्धार बनतो आहे. भास्कर जाधव यांची यातली उपस्थिती आणि ठाकरे गटाचा ठाम पाठिंबा हा संघर्ष अधिक सशक्त बनवत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!