महाराष्ट्र

Yashomati Thakur : पुरोगामी विचार संपविण्याचा भाजप – आरएसएसचा कट

Pravin Gaikwad : जनसुरक्षेच्या छायेत विचारांवर काळं फासलं

Author

राज्य सरकारने नुकतेच जनसुरक्षा विधेयक विधिमंडळात संमत केले. या विधेयकाच्या निमित्ताने विरोधकांनी सरकारवर हुकूमशाहीचा आरोप करत गदारोळ घातला असतानाच, अक्कलकोट येथे शांततेला नख लावणारी घटना समोर आली आहे.

अक्कलकोट येथे रविवारी 13 जुलै रोजी घडलेली धक्कादायक घटना संपूर्ण राज्याच्या विवेकाला हादरवून गेली. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर भरचौकात हल्ला करून त्यांच्या चेहऱ्यावर काळं फासण्याचा प्रकार घडला. ही कृती शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे पार पाडली. गायकवाड यांना त्यांच्या गाडीतून बाहेर खेचत, अंगावर काळं फासणं ही केवळ व्यक्तिविशेषावरील हल्ला नव्हे. तर विचारांवर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या गाभ्यावर झालेला थेट प्रहार होता, असं मत व्यक्त करत विरोधकांनी या घटनेचा निषेध केला आहे.

या घटनेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं असून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध केला आहे. ठाकूर म्हणाल्या की, अक्कलकोटमध्ये जे घडलं ते फक्त काळं फासणं नव्हे, तो भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पुरोगामी विचारांना गप्प करण्याचा एक भ्याड प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेवर हे थेट वार आहे. त्यांनी यासोबतच आरोप केला की, गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे. इतकंच नव्हे तर, काही महिन्यांपूर्वी हा व्यक्ती पुणे विमानतळावर जिवंत काडतुसे घेऊन जाताना पोलिसांच्या ताब्यात सापडला होता.

दोशींवर व्हावी कारवाई

यशोमती ठाकूर यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, छिंदम, भिडे, कोरटकर, सोलापूरकर यांच्यासारखे लोक जेव्हा महापुरुषांची बदनामी करत असतात, तेव्हा हे तथाकथित संस्कृती रक्षक कुठे असतात? तेव्हा यांचं ‘जनसुरक्षा’ कुठे झोपलेलं असतं? त्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत गृहखात्याने तातडीने दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली. या प्रकारामुळे जनसुरक्षा विधेयक खरोखर जनतेच्या सुरक्षेसाठी आहे की, विरोधी विचारांना दडपण्यासाठी वापरलं जाणारं राजकीय हत्यार? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित होत आहे. विरोधकांनी सरकारवर हुकूमशाहीचा आरोप करत आता आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

BJP : संभाजी ब्रिगेड अध्यक्षांवर हल्ला; भाजपच्या रक्तात नाही.. 

राज्याच्या राजकारणात सध्या आधीच उलथापालथ सुरू असून, एकीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशा पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये घडलेली ही घटना भाजपसाठी नवीन अडचण ठरणार का? यावर आता सर्वांचे लक्ष केंद्रीत झालं आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!