महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : पुरोगामी आवाज दाबण्यासाठी भाजपकडून पूर्व नियोजित हल्ला

Maharashtra Politics : 'संभाजी' नावावरून राज्यात पेटले नवीन राजकारण

Author

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक करून हिंसाचार केला. ज्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कठोर निषेध व्यक्त केला आहे.

राज्यातील सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर 13 जुलै रोजी अक्कलकोटमध्ये शाईफेक व काळे फासण्याचा प्रकार घडला. गायकवाड हे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज आयोजित कार्यक्रमासाठी अक्कलकोटमध्ये आले होते, तेव्हाच त्यांच्या सत्कार समारंभात अचानक गोंधळ निर्माण झाला आणि ही धक्कादायक घटना घडली. कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर संताप व्यक्त करत काळे फासले आणि त्यांच्यावर जोरदार धक्काबुक्की केली. केवळ तितकेच नव्हे तर त्यांच्या वाहनावर दगडफेक करत काही भागाची तोडफोडही करण्यात आली.

गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नव्हे तर पुरोगामी विचारांवर झाला आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. वडेट्टीवार म्हणाले, हल्ला पूर्व नियोजित होता. अशा घटना महाराष्ट्राच्या सहिष्णुतेच्या मूळ तत्त्वांना हादरवणाऱ्या आहेत.

Buldhana : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शिंदेंनी’ आणला भूकंप

पोलिसांचा पुढील तपास

वडेट्टीवार यांनी यावर कठोर कारवाईची मागणी करत म्हटले की, ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी उदाहरण ठरेल अशी कठोर कारवाई करावी. जनसुरक्षा कायद्यान्वये कारवाई करून अशा प्रवृत्तींना थांबवणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठणकावले. घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तातडीने प्रतिक्रिया देताना सांगितले की, संबंधित हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून कठोर कारवाई केली जाईल. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत म्हटले, मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्र थांबणार नाही, पण अशा हिंसक घटनांमुळे महाराष्ट्र बिहार होण्याच्या मार्गावर आहे.

सपकाळ यांनीही जनसुरक्षा कायद्यांतर्गत कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी आदर्श निर्माण करावे, असे आवाहन केले. प्रवीण गायकवाड हे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचं विचारविश्व घेऊन बहुजन समाजासाठी झटणारे कार्यकर्ते आहेत. अशा विचारशील नेत्यावर भाजपशी संलग्न गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. शिवधर्म फाऊंडेशनचे दीपक काटे व इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या हल्ल्यामुळे राज्यात फक्त कायदा सुव्यवस्थेचे नव्हे तर सामाजिक शांततेचेही मोठे संकट निर्माण झाले आहे. विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीच्या अधिकारावर झालेला हा आघात केवळ राजकीय नसून समाजाच्या मुळावर घाव घालणारा आहे.

Parinay Fuke : ठाकरे बंधूंचा सिनेमा लोक विनोद म्हणून पाहतात

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!