महाराष्ट्र

Amol Mitkari : विचारधारेच्या रणांगणात उजव्या टोळीवर निशाणा

Monsoon Session : शिवधर्म एकेरी, मग बजरंग दल का नाही?

Author

अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून काळी शाई फेकून आणि मारहाण करून हल्ला करण्यात आला.

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात शनिवारचा (१२ जुलै) दिवस एका धक्कादायक घटनेमुळे गाजला. अक्कलकोटमधील एका कार्यक्रमात पुरोगामी विचारवंत आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली आणि त्यांना मारहाण करण्यात आली. हा हल्ला फत्तेसिंह शिक्षण संस्था व सकल मराठा समाज यांच्या कार्यक्रमादरम्यान झाला. गायकवाड हे मंचावर सहभागी होण्यासाठी आले असताना काही आक्रमक लोकांनी त्यांच्या गाडीसमोर येऊन काळी शाई फेकली, गाडीतून जबरदस्तीने खाली ओढले आणि त्यांच्या अंगावर वंगण टाकून कपडे फाडण्याचा प्रयत्न केला.

हल्ला इतका अचानक आणि आक्रमक होता की, कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांना धक्काच बसला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हल्लेखोर हे ‘शिवधर्म फाउंडेशन’शी संबंधित होते. त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्या तोंडावर काळं फासून अपमानित केले. हल्ल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. समाजातील पुरोगामी घटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेबाबत अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र संताप व्यक्त करत केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. हा हल्ला केवळ एका नेत्यावर नाही, तर विचारांवर आहे. पुरोगामी विचार मांडणाऱ्यांना गप्प करण्याचा हा कट आहे.

Nana Patole : भाजपचा द्वेषवृत्तीचा चेहरा उघडा पडला

विचारांची लढाई सुरू

माझ्यासह इतर अनेक विचारवंतांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, असं मिटकरी म्हणाले. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, सभागृहात मी या विषयावर आवाज उठवणार आहे. जर सरकारने जनसुरक्षा विधेयकाच्या निमित्ताने डाव्या विचारसरणीच्या संघटनांवर बंदीचा विचार केला असेल, तर आम्हीही आता कट्टर उजव्या संघटनांवर बंदीची मागणी करणार आहोत. मिटकरी यांनी छत्रपती संभाजी ब्रिगेडच्या ऐतिहासिक भूमिकेचा उल्लेख करत सांगितले की, महापुरुषांच्या विचारांवर आधारित वैचारिक परिवर्तन घडवणाऱ्या संघटनेवर हल्ला म्हणजे कायद्याची थट्टा आहे.

महापुरुषांचा वारसा जपणं म्हणजे कोणाचं वैयक्तिक मालमत्ता नाही. विचारांची लढाई विचारांनीच लढली गेली पाहिजे, असं आम्ही मानतो. या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत या हल्ल्यामागे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी ब्रिगेड हे नाव आमच्या मित्राने रजिस्टर केलं आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत, पण शिवधर्म नाव एकेरी वापरायचं की नाही, यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी आधी श्री बजरंग दल यांचंही परीक्षण करावे. शिवाजी महाराजांवर असभ्य वक्तव्य करणारे सुरक्षित आहेत. पण आम्ही विचार मांडल्यावर आमच्यावर हल्ला होतो. ही घटना फक्त एका वैचारिक गटावरचा हल्ला नाही, तर ती लोकशाहीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा आघात आहे, असे मत अनेकांनी मांडले आहे.

Sanjay Khodke : कृषी क्षेत्राच्या नवसंजीवनीसाठी आमदारांचा व्हिजन प्लान

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!