महाराष्ट्र

Ravindra Shinde : भाऊभाऊंची मिठी गाजली; पण जिल्हाध्यक्ष म्हणाले, या ड्राम्यात ‘मी नाही’

Political Drama : चंद्रपूरच्या बँकेत भाजपचे फिक्स्ड डिपॉझिट

Author

चंद्रपूरचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा देत लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे दर पंधरा दिवसांनी नवीन सिझन असणारी एखादी वेब सिरीजच जणू. कधी युती, कधी फुटी, कधी गळती आणि कधी एकमेकांना मिठी. ही नाट्यपूर्ण गोष्ट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. ५ जुलै रोजी झालेली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ऐतिहासिक युती लोकांनी जल्लोषात साजरी केली होती. सोशल मीडियावर मीम्स, तर चहाच्या टपरीवर चर्चा रंगत होत्या, ‘ठाकरे बंधू एकत्र, आता मुंबई काय आपलीच’. पण नेहमीप्रमाणे, या सिरीजचा ट्विस्ट दहा दिवसातच आला. ‘मशाल’ घेऊन राजकारणात फिरणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या हाती पुन्हा एकदा ‘गॅस’ संपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही युती म्हणजे ‘शोभेची रांगोळी’ ठरतेय का, असा सवाल आता लोक विचारू लागलेत.

कारण, ठाकरे गटाच्या अंगणात पुन्हा एकदा ‘गळती’ सुरू झाली आहे. ही गळती पाण्याची नाही, तर थेट कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची. चंद्रपूरमधून आला एक ताजा झटका. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी ‘मशाल’ विझवली आणि भाजपचं ‘कमळ’ हाती घेतलं. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एक चांगली मॅच खेळली होती. पण विधानसभा निवडणुकीत महायुतीने त्यांना क्लीन बॉल्ड केले. आता तर स्थिती अशी झाली आहे की, महाविकास आघाडीमध्ये बसून कितीही जोरात ‘How’s the Josh?’ विचारलं, तरी ‘Low Sir’ हा उत्तरच येतंय. याच महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला सध्या ‘गेलं…गेलं…माझं सगळं गेलं’ अशी अवस्था आली आहे.

Aditya Thackeray : उत्तर मागता चड्डी बनियान गॅंग होते कीप क्वाईट

काँग्रेसला राजकीय धक्का

रवींद्र शिंदे चंद्रपूरचे कडक राजकारणी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तगडे जिल्हाध्यक्ष आणि मध्यवर्ती बँकेतील ‘किंगमेकर’. हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाची विधीवत पूजा मुंबईत, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हातून होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा धक्का म्हणजे घरातलेच दिवे वाऱ्यावर लावले गेलेत अशा प्रकारचा आहे. रवींद्र शिंदे हे बँकेवर चार वेळा संचालक झाले असून नुकतेच बिनविरोध निवडूनही आले आहेत. त्यांच्या नावाभोवती एक प्रकारची ‘बँकिंग अंडरकरंट’ आहे. यंदा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत ९ जागा भाजप समर्थकांनी जिंकल्या आणि काँग्रेसच्या गोटात हलकासा भूकंप झाला.

सध्या चर्चेला उधाण आलेले आहे की, शिंदे यांच्याकडे स्वतःचे ४-५ संचालक आहेत. भाजपच्या बॅलन्सशीटमध्ये ते एक ‘हाय व्हॅल्यू अॅसेट’ आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची ‘पदवधू’ म्हणून त्यांचं नाव पुढे येत आहे. म्हणजे काँग्रेसच्या बँकिंग वर्चस्वाला आता ‘Not Available in Your Region’ असा अलर्ट येऊ शकतो. या साऱ्या सत्तानाट्याचे डायरेक्टर म्हणजे बंटी भांगडिया. त्यांच्या संयोजकतेमुळे भाजपने बँकेवर मजबूत पकड घेतली. त्यांच्या प्लॅनिंगमुळे ‘शिंदे’ भाजपकडे झुकले. चंद्रपूरमध्ये काँग्रेसने जे ‘राजकीय माळेचे दाणे’ विखुरले होते. त्याचे मोत्यात रूपांतर करत भाजपने आता सत्ता आणि बँक दोन्ही आपल्या टचमध्ये आणले आहेत.

Sulbha Khodke : पर्यटन विकासाचा आराखडा घेऊन आमदार पोहोचल्या विधिमंडळात

एकतादेखील अधूरी वाटते

आता जर अध्यक्षपद शिंदे यांच्या गळ्यात पडले, तर काँग्रेसला UPI पेमेंट फेल पावती मिळाली नाही अशी नोटिफिकेशन दिसणार. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पण त्या गाठीने ‘गाठ’ काही अजून घट्ट बसलेली नाही. दुसरीकडे त्यांच्या गटातले कार्यकर्ते आणि नेते एकामागून एक दुसऱ्या बाजूला वळत आहेत. रवींद्र शिंदे यांचा भाजप प्रवेश, त्यांच्या अध्यक्षपदाची शक्यता आणि काँग्रेसच्या बँकिंग सत्तेला धक्का, या साऱ्या घडामोडींनी ठाकरे गटाच्या पारड्यात पुन्हा एकदा निराशा पडली आहे. कदाचित आता ठाकरे गटाला ‘विरोधकांचे WhatsApp ग्रुप’ सुरू करावे लागतील. ज्यात रोज सकाळी एक मोटिवेशनल मॅसेज येईल, ‘आजही काही कार्यकर्ते आपले आहेत’.

उद्या कोण कुठे असेल, याचा अंदाज लावणे म्हणजे निवडणुकीचा ‘बाबा वेंगा’ व्हायचा प्रयत्न करणे. पण सध्या चित्र असं दिसतंय की, चंद्रपूरमध्ये भाजपच्या पत्त्यांमध्ये ‘जोकर’ नाही, तर ‘एस’ (Ace) आहे. त्याचं नाव आहे रवींद्र शिंदे.

Nagpur : जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेचा नकाशा बदलला

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!