महाराष्ट्र

Parinay Fuke : लोकशाहीच्या रंगमंचावर एक आरती; मुख्यमंत्र्याची तुलना थेट पंचदेवतेशी

Monsoon Session : राजकीय सभा रंगली भक्ती रसात

Author

भाजपचे जेष्ठ नेते तथा आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, महादेव आणि सूर्य-चंद्राशी करत त्यांना देवतुल्य नेते म्हटले.

2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली आणि सत्तेच्या सिंहासनावर महायुती सरकार पुन्हा एकदा विराजमान झाली. महाविकास आघाडीला मागे टाकत भाजपच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने विकासाची चाके अधिक वेगाने फिरवायला सुरुवात केली. जुन्या रखडलेल्या योजना नव्या दमाने पुढे सरकल्या. काही नव्या प्रकल्पांना हिरवा कंदील मिळाला. या सर्व घडामोडींमध्ये नाव ठळकपणे पुढे आलं ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्यात सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन अंतिम टप्प्यात आहे. मात्र कामकाजापेक्षा चर्चेचा विषय बनला आहे तो म्हणजे विधान परिषदेतील माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केलेलं अभूतपूर्व आणि ‘दैवी’ स्तोत्र.

‘विकसित महाराष्ट्र @2047’ या विषयावर चर्चा सुरू असताना, विरोधकांनी सरकारला प्रश्नांच्या चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यावेळी भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी या वातावरणात सुर्य, चंद्र, श्रीराम, श्रीकृष्ण, महादेव आणि हनुमान यांची आठवण करून देत मुख्यमंत्री फडणवीस यांची उपमा थेट देवतांशीच केली. विरोधकांनी ही स्तुती ‘आरती-गाथा’ म्हणून हिणवली. तेव्हा डॉ. फुके म्हणाले, हो, आम्ही फडणवीसांची आरती गातो, कारण ते आमच्यासाठी देवतुल्य आहेत. त्यांच्या कार्यातून, सेवा वृत्ती मधून आणि नेतृत्वातूनच महाराष्ट्राचं खरंखुरं परिवर्तन घडलं आहे.

Abhijit Wanjarri : शबरीच्या उंबरठ्यावरचं स्वप्न, अजूनही वाट पाहतंय रामाची

नेतृत्वातील आदर्श गुण

डॉ. फुके यांनी फडणवीसांच्या कार्यकाळातील दहा वर्षांतील अनेक योजना आणि निर्णयांचा उल्लेख करत त्यांना ‘देव माणूस’ म्हटले. त्यांनी जलयुक्त शिवार, गाळमुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, ओबीसी मंत्रालय, मेट्रो प्रकल्प, आणि शेतीमधील संकटांवर उपाय अशा अनेक योजनांची यादी सादर करत सांगितले की, अशा नेत्याची स्तुती म्हणजे कृतज्ञतेचा आविष्कार आहे. डॉ. फुके यांच्या मते, मुख्यमंत्री फडणवीस हे नेतृत्व म्हणजे सूर्याचं तेज, चंद्राचं शीतलत्व, महादेवासारखी सहनशक्ती, श्रीकृष्णाची चातुर्यबुद्धी आणि प्रभू श्रीरामासारखे आदर्शत्व.

डॉ. फुके यांनी विशेषतः कोरोना काळातील फडणवीसांच्या कार्यपद्धतीची आठवण करून दिली. जेव्हा काही नेते घरी बसून कोमट पाणी पीत होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस रुग्णालयांत, गावागावांमध्ये नागरिकांच्या सेवेत कार्यरत होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवणं हे कुठल्याही देवतेपेक्षा कमी नाही, असे ते म्हणाले. त्यांनी हेही स्पष्ट केले की विरोधी पक्षनेते असतानाही फडणवीस यांनी सरकारला जबाबदारीची जाणीव करून देत अनेक महत्त्वाच्या योजना मार्गी लावल्या. या विधानानंतर संपूर्ण विधान परिषद, समाजमाध्यमं आणि राजकीय वर्तुळ डॉ. फुके यांच्या विधानांवर चर्चा करू लागले आहे.

Devendra Fadnavis : ऑपरेशन शोध अन् ऑपरेशन मुसकान, ‘मिसिंग’मध्ये आणणार पुन्हा जान

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!