उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे खुले कौतुक करत नेतृत्व, व्हिजन आणि कर्तृत्वाची प्रशंसा केली.
राजकारणात शत्रुत्व आणि मैत्री क्षणभंगुर असतात. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कधी एकमेकांवर तिखट टीका करणारे नेते एकमेकांच्या कर्तृत्वाचं खुलं कौतुक करताना दिसले. तेही महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण ठरावा, अशा पद्धतीने. देवेंद्र फडणवीस यांच्या 55 वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला, मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संदेशाने. एकेकाळी भाजपवर आणि विशेषतः फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करणारे ठाकरे यांनी यावेळी मात्र पूर्णपणे वेगळा सूर लावला.
उद्धव ठाकरेंनी केलेलं हे प्रशंसायुक्त वक्तव्य ‘महाराष्ट्राचा नायक’ या गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून प्रकाशित झालेल्या कॉफी टेबल बुकसाठी देण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत हुशार, मुत्सद्दी आणि अभ्यासू राजकारणी आहेत. त्यांच्या नेतृत्वात त्यांनी अनेक संकटांवर मात केली. केंद्रात त्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आपली प्रशंसा नोंदवली. या कौतुकानंतर भाजपच्या गोटातूनही वेगळाच सूर ऐकायला मिळाला. एकेकाळी उध्दव ठाकरे यांच्यावर धारदार टीका करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील माध्यमांसमोर सौम्य आणि सुसंस्कृत प्रतिक्रिया दिली.
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांच्या शहरातच ‘बेटी बचाओ’ घोषणा ठरली
महाराष्ट्राचा नायक
उध्दवजींनी वाढदिवसाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाचं कौतुक केलं, ही महाराष्ट्राच्या परंपरेची साक्ष आहे, असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. बावनकुळे म्हणाले, राजकारणात कधी मैत्री तर कधी मतभेद असतात. पण वाढदिवस किंवा आनंदाच्या प्रसंगी जेव्हा कोणी चांगलं काम करतं, तेव्हा त्याचें कौतुक करणे हे आपले सांस्कृतिक भान आहे. फडणवीस यांचे २०२९ पर्यंतचे विकसित महाराष्ट्राचं व्हिजन उद्धव ठाकरे यांनी सांगितले, याचा अर्थ त्या संकल्पनेला आता सर्वपक्षीय पाठिंबा मिळू शकतो. उध्दव ठाकरेंकडून झालेले हे कौतुक म्हणजे केवळ औपचारिक शुभेच्छा नसून, एका दूरदृष्टी असलेल्या राजकारणाचं उदाहरण आहे. यामुळेच बावनकुळे यांचीही भूमिका मवाळ झाली आहे.
कालपर्यंत ठाकरे घराण्याची मक्तेदारी संपवली पाहिजे अशा शब्दात टीका करणारे बावनकुळे आता ‘उद्धवजी’ म्हणत संवाद साधताना दिसत आहेत.‘महाराष्ट्राचा नायक’ या पुस्तकातून फडणवीसांच्या राजकीय प्रवासावर प्रकाश टाकताना ठाकरे यांनी त्यांच्या कार्यक्षमतेचं स्पष्ट आणि सुस्पष्ट कौतुक केले. त्यांनी म्हटलं, समोर आलेल्या आव्हानांवर आपल्या अभ्यासू आणि मुत्सद्दी स्वभावाने मात करून फडणवीसांनी आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. त्यांची प्रतिमा एक गतिमान, पक्षनिष्ठ आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्याची आहे.
Devendra Fadnavis : अति डाव्या विचारांच्या गर्भगृहात राहुल गांधी