महाराष्ट्र

Yashomati Thakur : बलात्काराचे आरोप, खंडणीचे व्यवहार हेच का तुमचे रामराज्य

Maharashtra : हनी ट्रॅपचं गुपित दडलंय कुठे?

Author

राज्यातील सत्ताधाऱ्यांवर हनी ट्रॅप आणि बलात्काराच्या आरोपांनी खळबळ उडाली आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडले आहे.

मुंबईच्या राजकीय वर्तुळात शनिवारी सकाळी अचानक भीषण खळबळ उडाली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका स्फोटक वक्तव्यामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघालं. त्यांनी असा दावा केला की, महाविकास आघाडी सरकार उलथवून सत्तेवर आलेले एकनाथ शिंदे सरकार एका ‘हनी ट्रॅप’ प्रकरणाच्या आधारे अस्तित्वात आली. याच प्रकरणातील ‘नाशिक सीडी’ हा एक महत्त्वाचा दुवा ठरत असल्याचं त्यांनी सूचित केलं. त्यांच्या या विधानाने खळबळ तर उडाली. यापूर्वी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत उघड आरोप केला होता की, अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी हनी ट्रॅपमध्ये सापडले आहे.

गोपनीय माहिती गळतीचा धोका निर्माण झाला आहे.या आरोपांना आणखी धार देताना काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी देखील उडी घेतली आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला. नाशिकच्या एका रिसॉर्टमध्ये गुप्त कॅमेरे बसवून कोट्यवधींच्या खंडणीच्या डील्स होतात, त्यावर सभागृहात चर्चा होते. पण मुख्यमंत्री मात्र असं काहीच नाही, अशा थाटात जबाबदारी झटकतायत, असा घणाघात करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला. पुढे बोलताना त्यांनी भाजपशी संबंधित प्रफुल्ल लोढा यांच्यावर POCSO आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांखाली खटले दाखल असल्याची आठवण करून दिली.

Chandrashekhar Bawankule : तिखट बोलणारे नेते आता शहाणपणाने बोलू लागले

मुख्यमंत्र्यांची जबाबदारी काय?

हेच लोढा एका भाजप मंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याचं सांगत, सत्ताधाऱ्यांच्या छत्रछायेखाली गुन्हेगार मोकाट फिरत असल्याचा आरोप त्यांनी केला.या प्रकरणात अजून एक अंग चक्रावून टाकणारं आहे. एका महिला होमगार्डने पत्रकार परिषदेत थेट दोन वरिष्ठ एसीपींवर बलात्काराचे आरोप केले. तिच्या म्हणण्यानुसार, गुंगीचे  औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. जेव्हा तिने पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिच्यावरच आणि तिच्या मुलीवर खोट्या खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले. तिने तक्रार केल्यानंतर तीन महिने उलटले तरी एकही ठोस कारवाई झाली नसल्याची तिची तक्रार आहे.

महिला होमगार्डने पुढे असा दावा केला की, हेच पोलीस अधिकारी घाटकोपरमधील एका फ्लॅटवर बांगलादेशी महिलांना घेऊन येतात आणि तेथे दारू पार्टीसह अश्लील प्रकार घडवतात. यामुळे संपूर्ण पोलीस खात्यावर आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.जेव्हा कायदा-सुव्यवस्थेचे रक्षकच गुन्हेगार ठरतात, तेव्हा याला सुशासन म्हणायचं का? असा संतप्त सवाल करत ठाकूर म्हणाल्या की, भाजप महायुती सरकारचं हेच ‘अच्छे दिन’ आहेत का? त्यांनी पुढील प्रश्न उपस्थित करत सरकारला अडचणीत टाकले आहे. नाशिक रिसॉर्टमधील कॅमेऱ्यांच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी का होत नाही? प्रफुल्ल लोढांवर गंभीर आरोप असूनही भाजप त्यांना संरक्षण का देतोय? महिला आयोग या संपूर्ण प्रकरणात मौन का पाळतोय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका नेमकी काय? असा प्रश्न यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांच्या शहरातच ‘बेटी बचाओ’ घोषणा ठरली

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!