महाराष्ट्र

Parinay Fuke : टिळकांचा वारसा आता नितीन गडकरींच्या कृतीत झळकणार

Nitin Gadkari : देशाला दिशा देणारा नेता होणार सन्मानित

Author

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना 2025 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. 1 ऑगस्ट रोजी पुण्यात पार पडणाऱ्या विशेष सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

राजकारणात अनेकजण भाषणं करतात, परंतु अत्यल्प लोक असतात जे कृतीतून कामगिरी सिद्ध करतात. अशा कार्यक्षम, स्पष्टवक्त्या आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्यांमध्ये एक नाव नेहमीच उठून दिसतं, ते म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी. गडकरी त्यांची वक्तृत्वशैली जितकी प्रभावी, तितकीच ती विचारशील आणि विनोदीही. नितीन गडकरी हे नाव आज केवळ राजकारणापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. तर पायाभूत विकासाच्या अनुषंगाने ‘देश गढणारा नेता’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.या कार्यपद्धतीचा गौरव म्हणूनच 2025 वर्षीचा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात येणार आहे.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट (हिंद स्वराज्य संघ) या संस्थेच्या वतीने 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात हा विशेष सोहळा होणार आहे. या दिवशी टिळकांची 105 पुण्यतिथी देखील आहे.या पुरस्काराची घोषणा होताच, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी नितीन गडकरींच्या कार्याची स्तुती करत हार्दिक अभिनंदन केले. स्वदेशी, स्वराज्य आणि राष्ट्रउभारणी या लोकमान्य टिळकांच्या तत्त्वांशी निष्ठा ठेवत नितीन गडकरी यांनी देशभरात भक्कम पायाभूत सुविधांचे जाळे उभे केले आहे. महामार्ग, बोगदे, उड्डाणपूल, पर्यावरणपूरक उपाय आणि रस्ते सुरक्षेत त्यांनी जे योगदान दिले आहे, त्याचा गौरव या पुरस्कारातून होतो आहे. त्यांच्या सन्मानाचा आम्हाला अभिमान वाटतो, असं डॉ. फुके यांनी सांगितले.

Vijay Wadettiwar : हनी ट्रॅपच्या जाळ्यात माशे नव्हे, शार्क अडकले

विकासासाठी समर्पित नेतृत्व

राजकीय भूमिका निभावत असताना सामाजिक-आर्थिक बदल घडवण्याची जी तळमळ गडकरींमध्ये आहे, तीच त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळं ठरवते, असंही डॉ. फुके यांनी नमूद केले. त्यांच्या मते, गडकरी हे केवळ नेता नाहीत, तर भारताच्या विकासदृष्टीचं नेतृत्व करणारे ‘विकासपुरुष’ आहेत.या पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते गडकरींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमात डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणती टिळक, रामचंद्र नामजोशी, सरिता साठे यांचाही सहभाग असेल.

विशेष म्हणजे, याच सोहळ्यात आजवर या पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या मान्यवरांचा जीवनप्रवास मांडणारा एक विशेष इंग्रजी ग्रंथ देखील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित केला जाईल.स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही टिळकांची चार सूत्रं आजही देशासाठी महत्त्वपूर्ण आहेत, असं सांगताना डॉ. रोहित टिळक यांनी गडकरींचं कार्य म्हणजेच लोकमान्यांच्या विचारांची आधुनिक पुनर्मांडणी असल्याचं स्पष्ट केले. राजकारण हे सत्तेचं नव्हे तर समाजबदलाचं साधन आहे, हे नितीन गडकरी यांनी आपल्या कारकिर्दीतून दाखवून दिलं आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासाला मिळालेला टिळक राष्ट्रीय पुरस्कार, हा खरंतर संपूर्ण देशासाठीच प्रेरणादायी ठरणारा आहे.

Yashomati Thakur : बलात्काराचे आरोप, खंडणीचे व्यवहार हेच का तुमचे रामराज्य

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!