महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : हनीच्या थेंबात सत्तेचा साप; 50 मंत्र्यांचे मुखवटे गळणार

Congress : रमीच्या डावात सापडलेली सत्ता, ना नैतिकता, ना शरम; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

Author

हनीट्रॅपचा सुळसुळाट थेट मंत्रिमंडळापर्यंत पोहोचल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला आहे. 50 बड्या चेहऱ्यांच्या अडकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हनीट्रॅप या प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या घोटाळ्याने आता उच्चपदस्थ मंत्र्यांच्या खुर्च्या हादरवायला सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात थेट स्फोटक आरोप करत सरकारला धक्का दिला आहे. हनीट्रॅपचं हे प्रकरण केवळ एक लफडा नसून, ही मोठी ब्लॅकमेलिंग इंडस्ट्री आहे, असं म्हणत त्यांनी स्पष्ट केलं की, या जाळ्यात सुमारे 50 मंत्री व उच्चपदस्थ अधिकारी अडकले आहेत.

वडेट्टीवार यांच्या मते, हनीट्रॅप प्रकरणात मोठे मासे अडकले आहेत. यात काही आजी-माजी मंत्री व प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ‘लोढा’ नावाच्या व्यक्तीने अनेक लोकांकडून जवळपास 200 कोटी रुपयांची वसुली केली असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. हा व्यक्ती कोणाच्या पाठिंब्यावर काम करत होता, हे मी सध्या सांगणार नाही. पण हे चेहरे लवकरच समोर येतील, यात शंका नाही, असे ते म्हणाले.

Balwant Wankhade : अमरावतीच्या रस्त्यांसाठी संसदेत पडली ठिणगी

जबाबदारी झटकली जाते

या सगळ्या प्रकरणाला अधिक ठोसपणे उभं करताना वडेट्टीवार म्हणाले की, कोणत्याही पक्षाचा माणूस असो, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. त्यांनी सरकारला थेट इशारा दिला की, हनी आहे, ट्रॅप आहे, पण सरकारच्या डोळ्यातलं डोळसपण कुठे आहे? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून त्यांनी असा सवाल केला की, हनीट्रॅपवर फक्त विनोद करून जबाबदारी झटकली जाते, पण वास्तविक संकट ओळखलं जात नाही.

गेल्या आठवड्यात काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही विधानसभेत मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र असल्याचा आरोप करत पेनड्राइव्हसह पुरावे सभागृहात सादर केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी ‘ना हनी, ना ट्रॅप’ म्हणत पटोलेंच्या आरोपांची खिल्ली उडवली होती. आता मात्र वडेट्टीवार यांच्या स्फोटक दाव्यांमुळे सरकारवरचा दबाव अधिक वाढला आहे.

Narendra Bhondekar : कृषिमंत्र्यांनी मागावी माफी, अन्यथा रोष उफाळेल 

न्यायालयाचे आदर

फक्त हनीट्रॅप प्रकरणच नाही, तर वडेट्टीवारांनी छावा कार्यकर्त्यावर मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाणवरही थेट आक्रमक भूमिका घेतली. जेव्हा एखादा कार्यकर्ता मारला जातो आणि पोलीस कारवाई टाळतात, तेव्हा यामागे सरकारचा पाठिंबा आहे का, असा संशय येतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर न्यायालयाचे आदर करणारे असतील, तर सुरज चव्हाणला अटक करावीच लागेल, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.

याचाच धागा पकडत त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर देखील घणाघात केला. शेतकऱ्यांना ‘भिकारी’ म्हणणारा, सभागृहात ‘रमी’ खेळणारा मंत्री जर आजही पदावर आहे, तर ही सरकारचीच शरम वाटावी अशी स्थिती आहे. सरकारला जर शेतकऱ्यांबाबत जराही कळवळा असेल, तर कोकाटे यांच्यावर कारवाई करून त्यांना त्वरित हटवलं पाहिजे, असे ते संतप्तपणे म्हणाले.

या सर्व आरोपांमुळे एकूणच राज्य सरकारची विश्वासार्हता डळमळीत होत चालली आहे. हनीट्रॅप + रमीट्रॅप = सरकारचा आत्मघातकी ट्रॅप का? असा थेट सवाल सध्या उपस्थित होत आहे. वडेट्टीवारांच्या या आरोपांनी केवळ सरकारच नव्हे, तर राज्यातील राजकीय व प्रशासकीय यंत्रणेलाही हादरा बसला आहे. आता सरकार यावर कोणती भूमिका घेते आणि खरोखरच दोषींवर कारवाई करते का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!