महाराष्ट्र

Buldhana : एमएसपीवरचा ज्वार झाला घोटाळ्याचा शिकार

ACB Trap : बुलढाण्यात लाचखोर अधिकारी एसीबीच्या सापळ्यात अडकला

Author

सत्तेच्या खुर्चीत बसून शेतकऱ्यांच्या ताटातला घास हिसकावणाऱ्यांवर अखेर न्यायाच्या हाताने धडकी भरवणारी कारवाई. 

शेतकऱ्याच्या घामाचा पैसा, असं म्हणणाऱ्यांचंच आता शेतकऱ्याच्या घामावर डल्ला मारण्याचं षडयंत्र उघडकीस आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पुरवठा विभागातल्या एका वरिष्ठ अधिकारी गजानन टेकाले याला एसीबीच्या पथकाने 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं आहे. यासोबतच त्याचा साथीदार असलेल्या सेवानिवृत्त लेखा निरीक्षक देवानंद खंडाले यालाही ताब्यात घेण्यात आलं. संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवणारी ही कारवाई मंगळवारी (23 जुलै) जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय आणि मुठ्ठे लेआउट, बुलढाणा येथे करण्यात आली.

एक प्रामाणिक शेतकरी, ज्याने आपला ज्वार सरकारी हमीभावावर (MSP) विकला होता, त्याच्या देयकाचे बिल पास करून देण्यासाठी, टेकाले आणि खंडाले या दोघांनी मिळून तब्बल 70 हजार रुपयांची लाच मागितली. काही बोलाचालींनंतर ते रक्कम 50 हजार रुपयांवर स्थिर झाली. पण हा शेतकरी भ्रष्टाचाराच्या या विळख्यात सापडायचा नव्हता. त्याने थेट भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग (ACB) बुलडाणा यांच्याकडे धाव घेतली.

Bacchu Kadu : सभागृहात रमीचा खेळ, नागपूरच्या रस्त्यांवर प्रहारचा उद्रेक

रंगेहात पकडलं

शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर ACB ने अत्यंत योजनाबद्धपणे सापळा रचला. 23 जुलै रोजी टेकाले व खंडाले यांनी 25 हजार रुपयांची पहिली किश्त स्वीकारताना, एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडलं. गजानन नंदकिशोर टेकाले वय 40, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी व देवानंद गंगाराम खंडाले, तानाजी नगर, बुलडाणा, हे दोघे आता कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.

कारवाईनंतर, एसीबीच्या दुसऱ्या पथकाने चिखली येथे टेकाले यांच्या निवासस्थानी धाड टाकली, जेणेकरून अन्य आर्थिक कागदपत्रे, बेहिशोबी संपत्ती, लाचखोरीचे इतर पुरावे हाती लागतील का, हे शोधता येईल. दरम्यान, बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सगळ्यात प्रेरणादायी बाब म्हणजे संबंधित शेतकऱ्याची हिमतीची भूमिका. भ्रष्ट यंत्रणेसमोर न झुकता त्याने लाच देण्याऐवजी, लाचखोरांवर कारवाई करण्याचा मार्ग निवडला, जो इतरांनाही धैर्य देणारा ठरतोय.

धडकी भरवणारा संदेश

या घटनेनंतर एकच सवाल उपस्थित होतोय की, शासनाच्या योजनांचा खरा लाभ घेतोय कोण? गरजू शेतकरी की लालसेने पछाडलेले अधिकारी? भ्रष्टाचाराच्या या कळसाला जर वेळेत लगाम घातला नाही, तर शेतकरी राजा” केवळ भाषणांपुरता उरेल. गजानन टेकाले व खंडाले यांच्या अटकेने एसीबीने एक धडकी भरवणारा संदेश दिला आहे की, शासनाच्या रकमानांवर तुमचं खाजगी ‘कमिशन’ चालणार नाही. एसीबीची ही कारवाई म्हणजे केवळ सुरुवात आहे. जर प्रत्येक शेतकरी लाचखोरांच्या विरोधात अशीच भूमिका घेत राहिला, तर व्यवस्थेतील अनेक गंजलेले दाते उखडून टाकणे शक्य आहे!

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!