महाराष्ट्र

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच पुन्हा उमटेल

Local Body Elections : महायुतीतील वादांवर फडणवीसांचं समाधानाचं सूत्र

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य करत विरोधकांना रोखठोक उत्तर दिले. विधानसभा निवडणुकीत जनतेचा कौल स्पष्ट झाला असून, स्थानिक निवडणुकींतही तोच कल दिसेल, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या निर्माण झालेल्या वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे विधानसभा निवडणुकीत दिसून आले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही ते स्पष्टपणे जाणवेल, असे सांगून फडणवीसांनी विरोधकांच्या मनातील भ्रम दूर केले आहेत. त्यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना हे मत व्यक्त केले.

अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या. या घटनेवरून राज्याच्या राजकारणात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात, महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते दिसेल, असे वक्तव्य केल्यावर त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत जनतेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमधून देखील तीच भावना प्रतिबिंबित होईल.

Chandrashekhar Bawankule : मंत्र्यांमधील वादात स्थैर्याची सलगी

राजकीय मर्यादा

फडणवीसांनी याच मुद्द्यावर भाष्य करताना ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही भावांचा एकत्र येणं ही आनंदाची गोष्ट असल्याचं नमूद केलं. मात्र, या वैयक्तिक नात्याचं राजकीय भांडवल केलं जाऊ नये, असा सूचक सल्लाही त्यांनी दिला. महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे जनतेच्या मतदानातून स्पष्ट होतं, पण काही नेत्यांच्या मनात काय आहे हे सांगता येणार नाही. त्यांच्या मनातील भावनाच महाराष्ट्राच्या मनात आहेत, असं समजणं चुकीचं आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

पुण्यातील एका बंगल्यावर झालेल्या रेव्ह पार्टीमुळे राज्यात खळबळ माजली आहे. यासंदर्भात फडणवीसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे पोलीस यंत्रणेने तत्काळ कारवाई केल्याचं सांगितलं. ही पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई यांनी आयोजित केल्याचा आरोप असून, यामुळे राजकीय पातळीवरही प्रतिक्रियांचे वादळ उठले आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर संयमित भाष्य करत माहिती संपूर्ण समजल्यावरच पुढील भाष्य करणार असल्याचे सूचित केले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

Shiv Sena : उद्धव ठाकरे यांच्या विचारधारेचा बुलढाण्यात प्रत्यक्ष प्रत्यय

मंत्र्यांमध्ये सुसंवादाची गरज

शिवसेना व भाजप महायुती सरकारमधील काही मंत्र्यांमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी चिंता व्यक्त केली. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात खात्याच्या बैठकीवरून निर्माण झालेल्या वादावर भाष्य करताना, त्यांनी स्पष्ट केले की, राज्यमंत्र्यांना देखील बैठक घेण्याचा अधिकार आहे. मात्र धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट मंत्र्यांशी सल्लामसलत आवश्यक आहे. राज्यकारभार सुरळीत राहण्यासाठी मंत्र्यांनी परस्पर संवाद साधावा, अडचणी असल्यास थेट मुख्यमंत्र्यांकडे यावं, पण पत्रव्यवहारातून नाराजी व्यक्त करणे हे योग्य पद्धत नाही, असे फडणवीसांनी नम्रपणे स्पष्ट केले.

राज्याच्या राजकारणात सध्या भावनिकतेचं आणि व्यूहरचनांचं एक विचित्र मिश्रण तयार झालं आहे. एकीकडे ठाकरेंचं वंशजत्त्व आणि दुसरीकडे मनसेचा पुन्हा एका प्रयत्नात उभारी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचं वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं ठरतं. त्यांनी राजकारणात भावनांपेक्षा स्पष्टतेला आणि कार्यक्षमतेला महत्त्व देण्याचा आग्रह पुन्हा स्पष्ट केला आहे.

महाराष्ट्रात येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक केवळ स्थानिक प्रशासकीय नेतृत्व ठरवणाऱ्या नसून, त्या आगामी राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणाऱ्या ठरणार आहेत. फडणवीस यांच्या वक्तव्याने भाजपच्या आत्मविश्वासाची झलक स्पष्टपणे दिसते. विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक निवडणुकींतून देखील जनतेच्या मनातील विश्वासाचीच पुनरावृत्ती होईल, असा विश्वास त्यांना आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!