महाराष्ट्र

Parinay Fuke : भंडारा जिल्ह्यामध्ये ‘एकच भाऊ’

Bhandara : डॉ. परिणय फुकेंच्या मास्टर मूव्हने नानांचे प्यादे डळमळले

Share:

Author

भंडारा जिल्हा दुग्ध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने काँग्रेसला पराभूत करत विजय मिळवला. या यशामागे भाजप नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांची निर्णायक रणनीती आहे.

भंडारा जिल्ह्यात सध्या राजकारणाचा वारा एका नावाभोवती फिरत आहे. तो म्हणजे भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. पूर्व विदर्भातील राजकीय हालचालींमध्ये डॉ. फुके यांनी महायुतीचा पाया भक्कम करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आता फळ मिळत आहे. विधानसभा निवडणुकीपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आणि दुग्ध संघाची निवडणूक होईपर्यंत, प्रत्येक क्षेत्रात महायुतीच्या सत्तास्थापनेसाठी त्यांनी नितांत काम केले आहे. 28 जुलै 2025 रोजी झालेल्या भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीने काँग्रेसला मोठा पराभव दिला. या विजयामागे डॉ. परिणय फुके यांचा हात असल्याचा स्पष्ट ठसा उमटला.

नाना पटोले जिल्हा बँक निवडणुकीच्या पराभवातून सावरले असतांना त्यांना परत एकदा दुग्ध संघाचा पराभव स्वीकारावा लागला. 30 जुलै 2025 रोजी भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. ज्यामध्ये परत एकदा महायुतीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भंडारा जिल्हा दुग्ध संघ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या युतीने विलास रामकृष्ण काटेखाये यांना विजय मिळवून दिला. 12 संचालकांपैकी काँग्रेसचा एक संचालक मतदानाच्या वेळी गैरहजर होता. ज्यामुळे काँग्रेसचे उमेदवार विवेक पडोळे यांना पराभव पत्करावा लागला.

Parinay Fuke : आमदारांनी दिली तरुण विचारांना सभागृहातली ‘शासनवाणी’

राजकारणात बुद्धिबळाचा वापर

विलास काटेखाये यांनी सहा मते मिळवून अध्यक्षपदावर नाव नोंदवले.  तर काँग्रेसच्या उमेदवाराला फक्त पाच मते मिळाली. या निकालानंतर काँग्रेसच्या नेतृत्वावर नव्या प्रश्नांची उभारणी झाली आहे. विशेषतः नाना पटोले यांच्या कामगिरीवर. भंडारा जिल्ह्यातील या निवडणुकीचा निकाल पूर्व विदर्भातील राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. या निवडणुकीत डॉ. परिणय फुके यांनी आपली रणनीती इतकी काटेकोर आखली होती की दोन दिवसांत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. डॉ. परिणय फुके हे केवळ राजकारणातच नव्हे तर बुद्धिबळामध्येही माहीर आहेत. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्षपदी ते विराजमान आहेत.

बुद्धिबळातील चालींचा त्यांना खोलवर अभ्यास आहे. कोणते प्यादे पुढे ढकलायचे आणि कोणाला आऊट करायचे हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. बुद्धिबळातील हेच नियम त्यांनी राजकारणही वापरले आहे. ज्यामुळे विरोधकांना ‘चेकमेट’ करणारे नेते म्हणूनही ते ओळखले जातात. दुग्ध संघाच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ते भंडारा जिल्ह्यात ठिय्या जमवून होते. निवडणुकीच्या आधी त्यांनी बुद्धिबळाचा वजीर असा फिरवला की, नानांना शह मात देत त्यांचा प्यादा गायब केला. पूर्व विदर्भाच्या राजकारणात डॉ. फुके हे एकमेव असे नाव आहे जे संघटन, कौशल्य आणि प्रभावी नेतृत्व यामुळे विरोधकांना सतत मागे टाकत आहे. त्यांनी दाखवले आहे की, राजकारण हा फक्त ताकद आणि मतांचा खेळ नाही तर, त्यात बुद्धिमत्तेने, संयमाने आणि कडक धोरणांनी खेळणे गरजेचे आहे. त्यांच्या या ‘राजकीय बुद्धिबळाने’ भंडारा जिल्ह्यात महायुतीने विजयाची माळ घातली आहे.

Bhandara : सहकाराच्या सिंहासनावर फुके-पटेल विराजमान, नानांचे मनसुबे धुळीस

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!