महाराष्ट्र

NMC Election : गणेशोत्सवाआधी वॉर्डनाट्य, दिवाळीनंतर मतनाट्य

Ward Delimitation : संत्रानगरीच्या राजकारणात उभा केला नवा नकाशा

Author

नागपुर महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यावर आहे. प्रभाग परिसीमन प्रक्रिया 28 ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची अखेरच्या अखेर सुटका झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकींच्या तयारीला गती दिली आहे. संपूर्ण राज्यभर राजकीय हालचालींना बळ मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली या निवडणूक आता काही महिन्यांत प्रत्यक्षात येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राज्याच्या उपराजधानी असलेल्या नागपुरात तर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला खऱ्या अर्थाने जोर आला आहे. निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने वॉर्ड परिसीमनाची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे.

येत्या 28 ऑगस्टपर्यंत अंतिम सीमारेषा निश्चित होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष प्रचारात झोकून देतील. दिवाळीपूर्वीची ही राजकीय उलथापालथ राज्याच्या निवडणूक रंगभूमीला तापवून टाकणार, हे निश्चित.  1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट या कालावधीत नगर विकास विभाग झोन स्तरावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिसीमनाबाबत बैठकांचे आयोजन करणार आहे. त्यानंतर 5 ते 11 ऑगस्ट दरम्यान प्रारूप तयार करून ते राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया 22 ते 28 ऑगस्टदरम्यान अंतिम टप्प्यात पोहोचेल. त्यावेळेस नवीन प्रभाग सीमा आणि संरचनेचे अंतिम घोषणापत्र जाहीर होईल.

Devendra Fadnavis : ज्ञानाच्या दारावर आता टेक्नॉलॉजीची टकटक

बूथ लेव्हल सर्वेक्षण

नवीन परिसीमनामुळे अनेक प्रभागांचे स्वरूप बदलणार असून काही नेत्यांना आपल्या मतदारसंघाचे पुनर्मूल्यांकन करावे लागणार आहे. हे बदल राजकीय समीकरणांमध्ये मोठा फरक घडवून आणतील, असा राजकीय विश्लेषकांचा ठाम अंदाज आहे. या निवडणुकीत केवळ निवडणूकच नव्हे तर अनेकांची राजकीय भविष्यही नव्याने ठरवली जाणार आहे. 29 ऑगस्टपासून ते 8 सप्टेंबरपर्यंत मतदार यादीच्या पुनरीक्षणाचा महत्त्वाचा टप्पा पार पडणार आहे. बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घरोघरी जाऊन नव्या मतदारांची नावनोंदणी करतील, तसेच मृत, स्थलांतरित किंवा अपात्र व्यक्तींची नावे यादीतून वगळण्यात येतील. या प्रक्रियेनंतर 9 ते 15 सप्टेंबर या काळात नागरिकांना हरकती व सूचना नोंदवण्याची संधी दिली जाईल.

16 ते 22 सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोग तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध करेल.  त्यानंतर 3 ते 6 ऑक्टोबर या दरम्यान अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येईल. राजकीय घडामोडींच्या गतीवर नजर टाकल्यास, गणेशोत्सवानंतर प्रचार मोहिमांमध्ये प्रचंड वाढ होईल. प्रत्येक पक्ष आपली रणनीती आखत असून, नव्या वॉर्ड संरचनेनुसार संभाव्य उमेदवारांची यादी आणि प्रचार यंत्रणा सज्ज करत आहेत. नागपूर महानगरपालिकेची निवडणूक ही केवळ स्थानिक सत्ता स्थापनेसाठी नव्हे, तर पक्षाच्या पुढील भविष्याचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या दृष्टिकोनातून ही लढत अत्यंत निर्णायक असणार आहे. प्रभाग परिसीमन, मतदार यादी पुनरावलोकन आणि विविध राजकीय हालचाली पाहता, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक निवडणूक आता केवळ काही पावलांवर आहे. ही निवडणूक म्हणजे केवळ जनतेचा कौल नव्हे, तर भविष्यातील राजकीय समीकरणांचा निर्णायक क्षणही ठरणार आहे.

Parinay Fuke : आमदारांच्या चालीने उजळली दिव्या देशमुखची वाट

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!