महाराष्ट्र

Devendra Fadnavis : तुम्ही कायद्याचे पालन करत असाल तर चिंता नको

Nagpur : अर्बन नक्षल वादावर मुख्यमंत्र्यांचा ठाम स्टँड

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेच्या अर्बन नक्षल टिपण्णीला प्रत्युत्तर देत, कायद्यानुसार अटक होण्याचा इशारा दिला.

महाराष्ट्राचे राजकारण सध्या एक मोठ्या पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या नाटकासारखे रंगत आहे. कोणत्या अंकात काय धमाका होईल, कोण बाजी मारेल, हे कुणालाच सांगता येत नाही. हाच मुद्दा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गदारोळाचा विषय ठरला आहे. मराठी भाषेच्या मुद्यावरून सुरू झालेले राजकारण सध्या शांत पडत आहे. मात्र म्हणतात ना ‘एक चिंगारी आग लगाने के लिए काफी हैं’, असंच काहीसं चित्र महाराष्ट्रात दिसून येत आहे. एका नेत्यांच्या वक्तव्याने हाच वाद पुन्हा उफाळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या गृहनगरात आहेत. दरम्यान त्यांनी मोठे वक्तव्य करत विरोधकांचे तोंड बंद केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वादग्रस्त वक्तव्ये केल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुफान प्रतिउत्तर देऊन आपल्या विधानाचा ठाम इशारा दिला. राज ठाकरे यांनी जनसुरक्षा कायद्यावरून एक महत्त्वपूर्ण वाद उचलला. रायगड जिल्ह्यातील एका भाषणात त्यांनी शेकापचे नेते जयंत पाटील यांचे कौतुक करत, राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. राज ठाकरे यांनी शासनाच्या धोरणावर टीका करताना जनसुरक्षा कायद्याबाबत कडवट टिप्पणी केली होती. त्यांनी म्हटले, आता काय तो कायदा आणला म्हणे, अर्बन नक्षल म्हणून अटक करणार, पण अटक करूनच दाखवा, असं चॅलेंज त्यांनी दिले होते.

Nagpur Police : देवा भाऊंच्या शहरात ‘यु टर्न’चा कमाल

भाषेचा समतोल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले, तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल, तर तुमची अटक होईल. फडणवीस म्हणाले, कायदा राज्याच्या जनतेच्या सुरक्षेसाठी आहे. तो त्यांना अमलात आणला जातो. जर तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल, तर कायद्याचे पालन करत तुमची अटक केली जाईल. फडणवीस यांचे हे उत्तर ठाकरे यांना चांगलेच टोचले. तथापि, फडणवीस यांनी स्पष्ट केले की, आंदोलन करणाऱ्यांना, सरकारविरोधात बोलणाऱ्यांना या कायद्याचा वापर नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेबद्दल आपली भूमिका ठरवली आहे. त्यांना मराठीचे महत्त्व निश्चितच मान्य आहे, परंतु त्याचबरोबर भारतीय भाषांप्रती ते सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात.

मराठी मुलांना मराठी  शिकावे, हे निश्चित आहे. पण याचवेळी त्यांना एक भारतीय भाषा शिकावी, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. त्यांनी राज ठाकरे यांच्या इंग्रजीविरोधी भाष्याला प्रत्युत्तर देताना, इंग्रजीचा अतिरेक करणे आणि भारतीय भाषांवर दुर्लक्ष करणे, ही मानसिकता स्वीकारता येत नाही. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, मराठीसोबत एक भारतीय भाषा शिकणे हाच खरा मार्ग आहे. आपण भारतीय भाषांशी तडजोड करायला नको आणि इंग्रजीला पंढरपूरचे स्थान देणे, असे नाही होऊ शकत, असं फडणवीस म्हणाले.

Parinay Fuke : आता प्रत्येकाच्या तोंडी असेल दिव्याची यशोगाथा

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!