महाराष्ट्र

Prahar Protest : सरकार विसरले आश्वासन अन् आठवले फक्त पोलिस स्टेशन

Amravati : मुख्यमंत्री यायच्या आधीच लोकशाही गेली हवालात

Author

अमरावती जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करत सरकारवर उदासीनतेचा आरोप केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय रणभूमीवर पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा धगधगत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासाठी आवाज उठवत असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने सरकारच्या उदासीनतेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी यापूर्वी अमरावतीत एक आठवडा अन्नत्याग उपोषण केले होते. सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतरही प्रत्यक्षात कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रहार कार्यकर्त्यांचा संयम सुटलेला आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सातबारा कोरा करा ही मागणी घेऊन सुरू झालेल्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण तरीही शासनाने या आंदोलनाकडे गंभीरतेने पाहिलेले नाही.

उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी दौऱ्याच्या दिवशी प्रहारच्या आंदोलक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. 3 ऑगस्ट 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर आहेत. शेतकरी आणि शेतमजुरांच्या मागण्या मांडणारे फलक लावणे म्हणजे देशद्रोह ठरतो का, असा सवाल आता प्रहारच्या कार्यकर्त्यांनी थेट सरकारला विचारला आहे. वरुड तालुक्यातील अजय चौधरी, प्रवीण कडू, विलास पांडगडे आणि इतर कार्यकर्ते शेतकऱ्यांसोबत मागण्यांचे फलक घेऊन उभे होते. याच दरम्यान पोलिसांनी त्यांना अटक केली. सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांनाच गुन्हेगार ठरवण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप प्रहारकडून करण्यात आला आहे.

Yashomati Thakur : उंदरांच्या राजवटीत आरोग्य व्यवस्थेचा फज्जा

शेतकरी आंदोलनावर दडपशाही

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वरुड व मोर्शी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सरकार विरोधात कोणतेही आंदोलन उभे राहू नये, म्हणून अनेक कार्यकर्त्यांना अगोदरच अटक केली गेली. शेतकरी फक्त कर्जमाफीची तारीख विचारतोय आणि त्यावरून अटक केली जात असेल, तर याला लोकशाही म्हणायचे का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होतो. शासन जेव्हा स्वतःच दिलेल्या आश्वासनांपासून माघार घेते, तेव्हा जनता आंदोलनाच्या मार्गावर उतरते. पण सरकार आंदोलनकर्त्यांच्या हक्कांवर बंदोबस्ताचा दडपशाहीचा शिक्का मारत असल्याची टीका प्रहार कडून करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीची गळचेपी आहे, असे स्पष्ट करत प्रहारने सरकारला इशारा दिला आहे.

प्रहारचे म्हणणे स्पष्ट आहे. ही केवळ लढाई नाही, ही भविष्यासाठीची उठाव आहे. शेतकरी प्रश्नावरून उभी राहणारी क्रांती ही कुठल्याही एका पक्षाची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त जनतेची आहे. पोलीस बळ वापरून प्रश्न दाबता येत नाहीत, उत्तर दिल्यासच समाधान मिळते.बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले हे आंदोलन म्हणजे भविष्यातील शेतकरी क्रांतीचा पहिला अध्याय आहे, असा दावा प्रहारने केला आहे. कर्जमाफीची तारीख जाहीर न करता अटक करून प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण ही कृती उलट आंदोलनाला नवसंजीवनी देईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे. शासन जर उत्तर देण्यास टाळाटाळ करणार असेल, तर आंदोलनाची तीव्रता वाढतच जाईल. शेतकरी आता थांबणार नाही.

Vijay Wadettiwar : विरोधकांनी उघड केला खाटेवरच्या महाराष्ट्राचा काळा अध्याय

सरकारला थेट डोळ्यात डोळा घालून प्रश्न विचारत राहणार. लोकशाहीत प्रश्न विचारणे हा गुन्हा कधीपासून झाला? असा खडा सवाल करत प्रहार जनशक्ती पक्षाने कर्जमाफीच्या लढ्याची नवी दिशा ठरवली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!