महाराष्ट्र

Archit Chandak : गुन्हेगारांना गय नाही, कारवाई सुरूच राहणार

Akola : प्रहार मोहिमेत अमली पदार्थ तस्करीचा मोठा आढावा

Author

अकोला जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन प्रहार मोहिमेत अवैध दारू व जुगार अड्ड्यांवर मोठी कारवाई करण्यात आली.

अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र होताना दिसतेय. अमली पदार्थ, गावठी दारू आणि जुगार अड्ड्यांवर होणाऱ्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे एक स्पष्ट संदेश दिला जातोय, अकोल्यात गुन्हेगारीसाठी आता जागा नाही. या लढ्याचे प्रमुख शिल्पकार म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक. ज्यांच्या सूचनेनुसार ऑपरेशन प्रहार अंतर्गत केलेली ताज्या कारवाईने पुन्हा एकदा संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. संपूर्ण जिल्हाभर पोलिसांची नजर ठिकठिकाणच्या संशयितांवर आहे. पारस आणि अकोट फाईल भागात एकाच दिवशी केलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 64 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

गावठी दारू, देशी दारूचे नग, रोख रक्कम, मोबाईल आणि एक दुचाकी वाहन यांचा यामध्ये समावेश आहे. पारस भागात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तडाखेबंद छापे टाकले. अंकुश बाळू तीतूर, येसान खान जहागीर खान आणि मिलिंद नागोराव तायडे या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवायांमध्ये २४ नग देशी दारू, ४० लिटर गावठी दारू, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि होंडा अ‍ॅक्टिवा असा मिळून 59 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही सगळी कारवाई अंमलात आणताना पोलीस पथकाने अत्यंत काटेकोर नियोजन आणि दक्षता ठेवली होती.

Vijay Wadettiwar : मोबाईलच्या ‘स्क्रोल’वरून मनाच्या पानांकडे वळवण्याचा प्रयत्न

अनुभवी टीमची कारवाई

पारस परिसरात केवळ अवैध दारूच नव्हे, तर त्यामागील संपूर्ण जाळं उध्वस्त करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. दरम्यान, अकोट फाईल पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर देखील पोलिसांनी धाड टाकली. अरविंद पाईकराव, जावेद शहा आणि शेख रफिक या तिघांवर कारवाई करत 4 हजार 500 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. जुगार अड्ड्यांवर अचानकपणे घातलेले हे छापे स्थानिक गुन्हेगारांमध्ये दहशत पसरवणारे ठरले. या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्यांच्यासोबत अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके आणि त्यांच्या अनुभवी पथकातील अधिकारी

सपोनि गोपाल ढोले, पोहवा रवी खंडारे, अब्दुल माजिद, वसीम शेख, किशोर सोनोणे, कमलाकर सोनवणे, सुलतान पठाण, खुशाल नेमाडे, सतीश पवार आणि राज चंदेल यांचा समावेश होता. अर्चित चांडक यांच्या दूरदृष्टीने आणि निर्णायक धोरणाने अकोल्यातील पोलिस यंत्रणा अधिक कार्यक्षम आणि जबाबदार बनली आहे. ऑपरेशन प्रहार अंतर्गत भविष्यात अशी आणखी कारवाई होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. अवैध धंद्यांना कायमचा चाप बसवण्याचा पोलिसांचा निर्धार आता कृतीतून स्पष्ट दिसतोय.

Devendra Fadnavis : विकास थांबायला वेळ नाही, मुख्यमंत्र्यांचा डेडलाईन धमाका

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!