महाराष्ट्र

Prashant Padole : पूर्व विदर्भाचे डिजिटल कनेक्शन आता थेट दिल्लीत

East Vidarbha : लोकसंघाच्या प्रगतीचा आराखडा घेऊन खासदारंनी गाठली राजधानी

Author

गोंदिया-भंडारा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. प्रदेशातील डिजिटल पायाभूत सुविधा व कौशल्य विकासासाठी विशेष सहकार्य त्यांनी मागितले.

पूर्व विदर्भात नावाजलेले लोकप्रतिनिधी तथा भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे लोकसभा मतदारसंघाचे आक्रमक खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी पुन्हा एकदा डिजिटल क्रांतीसाठी निर्णायक पाऊल उचलले आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी त्यांनी नवी दिल्लीत थेट केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि भंडारा-गोंदिया जिल्ह्यासाठी भविष्यातील डिजिटल रोडमॅप सादर केला. 7 ऑगस्ट 2025 रोजी पार पडलेल्या या भेटीत, डॉ. पडोळे यांनी पूर्व विदर्भाच्या सामाजिक-आर्थिक उत्थानासाठी एक सशक्त डिजिटल यंत्रणा उभी करण्याचा आराखडा मंत्र्यांसमोर मांडला.

ग्रामीण व आदिवासी बहुल भागातील तरुणांना डिजिटल शिक्षण, नवीन नोकरीच्या संधी, स्टार्टअप संस्कृती आणि माहिती तंत्रज्ञानाच्या आधारावर सक्षम बनवण्याचा हा व्यापक दृष्टिकोन होता.डॉ. पडोळे यांनी आपल्या निवेदनात गोंदिया-भंडारा भागासाठी अनेक ठोस आणि दूरदृष्टीपूर्ण मागण्या मांडल्या आहेत. ज्या या प्रदेशाच्या भविष्यासाठी महत्वाच्या ठरतील. त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीत नवीन कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) उभारण्यासोबत विद्यमान केंद्रांचे तांत्रिक सक्षमीकरण करण्याची गरज अधोरेखित केली आहे. तसेच, तरुणांना कोडिंग, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा एंट्रीसारख्या आधुनिक डिजिटल कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करण्यासाठी डिजिटल कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्याचा प्रस्ताव त्यांनी केला आहे.

Indian Politics : बुद्धिबळाची अनपेक्षित चाल; उपराष्ट्रपतीपदावर बसणार कोण?

इंटरनेटचा जलद विस्तार

डिजिटल व्हिलेज मॉडेल अंमलात आणून निवडक गावांना स्मार्ट गावांमध्ये रूपांतरित करण्याची योजना त्यांनी मांडली आहे. स्थानिक स्टार्टअप्ससाठी सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी IT हब व इनक्युबेशन सेंटर्सची निर्मिती करणे हेही त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. शेवटी, भारतनेट प्रकल्पांतर्गत जलद आणि विश्वासार्ह इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा विस्तार करून दूरदराजच्या भागांमध्येही सहज डिजिटल सेवा पोहोचवण्याची गरज त्यांनी विशेषत: नमूद केली आहे.या भेटीत डॉ. पडोळे यांनी ठामपणे सांगितले की, डिजिटल इंडिया ही फक्त योजना नाही, ती एक क्रांती आहे. गोंदिया-भंडारा हे भाग आजही डिजिटलदृष्ट्या मागे आहेत.

केंद्र सरकारचा जर ठोस पाठिंबा मिळाला, तर हेच भाग डिजिटल प्रगतीचे नेतृत्व करू शकतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, डिजिटल सक्षमीकरण ही केवळ सोयी-सुविधा नसून, समाजात परिवर्तन घडवणारी शक्ती आहे. शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, नोकरी सर्व क्षेत्रांतून डिजिटल झेप आवश्यक आहे. यासाठी पायाभूत सुविधा तयार करणे हा सरकारचा प्राथमिक हेतू असायला हवा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही खासदार डॉ. पडोळे यांच्या प्रस्तावांचे गांभीर्याने आणि सहानुभूतीने अवलोकन केले. त्यांनी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आणि म्हणाले की, पूर्व विदर्भाच्या डिजिटल विकासासाठी योग्य पावले उचलण्यात येतील. या भेटीमुळे हे स्पष्ट झाले की डॉ. प्रशांत पडोळे हे केवळ प्रशासकीय प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे नेतेच नाहीत, तर डिजिटल युगाची गरज ओळखून दूरदृष्टीने काम करणारे टेक्नो-व्हिजनरी खासदार आहेत.

Prakash Ambedkar : शरद पवार हे भाजपाचे हायप्रोफाईल हस्तक

ग्रामीण भारताच्या डिजिटल रूपांतरणाचा मार्ग भंडारा-गोंदियामार्फत तयार होतोय. या प्रक्रियेला आता खऱ्या अर्थाने गती मिळण्याची चिन्हे आहेत. पूर्व विदर्भाच्या डिजिटल युगात स्वागतासाठी, खासदार पडोळे यांचा पुढाकार म्हणजे संधींचे नवे दार उघडणारा प्रयत्न. आता सर्वांच्या नजरा केंद्र सरकारच्या पुढील पावलांकडे वळल्या आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!