मराठा समाजाला न्याय मिळावा आणि ओबीसींच्या हक्कांवर गदा येऊ नये, यासाठी फडणवीस सरकार कटिबद्ध असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाच्या न्यायासाठी देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या नऊ वर्षांत केलेल्या कामगिरीची उजळणी करताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, मराठा समाजाला न्याय मिळावा हे आमचे ध्येय आहे. मात्र त्याचवेळी ओबीसी समाजाच्या हक्कांवर अन्याय होणार नाही याची खबरदारीही सरकारने घेतली आहे. मराठा समाजाने भाजपला भरभरून पाठिंबा दिला. तसेच ओबीसी समाजानेही विश्वास दाखवला. त्यामुळे प्रत्येक समाजाच्या हक्कांचा सन्मान राखणे हीच आमची भूमिका आहे, असे बावनकुळे यांनी नमूद केले.
बावनकुळे म्हणाले की, आंदोलन करणाऱ्यांना दूर सारण्याची वृत्ती फडणवीस यांच्यात कधीच नव्हती. उलट नियमांच्या चौकटीत राहून प्रत्येक मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. 50 वर्षांत न झालेले कार्य फडणवीसांनी केवळ नऊ वर्षांत मराठा समाजासाठी केले आहे, हेच त्यांच्या संवेदनशील नेतृत्वाचे दर्शन घडवते.
Yashomati Thakur : स्वस्त परदेशी कापसाने शेतकऱ्यांचा घेतला बळी
मराठा समाजाला बळ
बावनकुळे यांनी सांगितले की, ओबीसी आरक्षणासाठी देशभरात आंदोलन सुरू होती. मात्र केंद्राने दिलेल्या 10 टक्के EWS आरक्षणामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाला रोजगार आणि शिक्षणात मोठा फायदा झाला. फडणवीस सरकारने सारथीसारख्या योजनांद्वारे मराठा समाजाला बळकट करण्याचे प्रयत्न केले आहेत. या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला झाला आहे. ओबीसींच्या आरक्षणात कुठलाही हस्तक्षेप न करता मराठा समाजाला न्याय देणे हीच भाजपची स्पष्ट भूमिका आहे.
बावनकुळे यांनी टीका करताना म्हटले की, काँग्रेसने कधीही ओबीसी समाजाच्या न्यायासाठी ठोस पाऊल उचलले नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावरच ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा मिळाला. तसेच ओबीसी मंत्रालयाची निर्मितीही फडणवीस यांच्या काळात झाली. मात्र आज काँग्रेस नेते आंदोलनाला पाठिंबा देत असले तरी मराठा समाजाला नेमके कसे आरक्षण द्यावे याबाबत त्यांची भूमिका अस्पष्ट आहे.
Yashomati Thakur : स्वस्त परदेशी कापसाने शेतकऱ्यांचा घेतला बळी
पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
बावनकुळे यांनी शरद पवार यांच्याकडे लक्ष वेधत सांगितले की, मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून वाटा देणे म्हणजे 353 जातींच्या आरक्षणावर परिणाम होईल. त्यामुळे एका समाजाला दिलासा देताना दुसऱ्याच्या हक्कावर गदा आणणे ही योग्य दिशा ठरणार नाही. पवार यांची भूमिका स्पष्ट व्हायला हवी, असेही त्यांनी ठामपणे म्हटले. भाजप हा पक्ष प्रत्येक समाजाच्या मागे उभा आहे, असे सांगत बावनकुळे यांनी ‘सरसकट आरक्षण’ या संकल्पनेला विरोध दर्शवला. सर्वेक्षणाद्वारे खऱ्या पात्रांना ओबीसीमध्ये समाविष्ट केले जात आहे. ज्यांच्याकडे प्रमाणपत्रे आहेत त्यांनाच न्याय दिला जात आहे. अजूनही सर्वेक्षण सुरू असून, ज्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही त्यांनाही न्याय मिळेल, अशी हमीही त्यांनी दिली.
