काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना झटका बसलाय. पटोले यांनी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने बाद ठरविला आहे.
पुण्यातून काही नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आल्याचे प्रकरण मध्यंतरी गाजले. याप्रकरण विद्यमान पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला चर्चेत आल्या होत्या. रश्मी शुक्ला यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना दावा दाखल केला होता. पटोले यांचा हा दावा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने अवैध ठरविला आहे. पटोले यांचा दावा रद्द करण्यात आला आहे. कोर्टाच्या निर्णयामुळं पटोले यांना मोठा झटका बसला आहे.
राज्यातील अनेक नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. त्यावेळी रश्मी शुक्ला या पुण्यात कार्यरत होत्या. पटोले यांनी या प्रकरणी 500 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा कोर्टात दाखल केला होता. 2017-18 या वर्षातील हे प्रकरण आहे. चौकशी झाल्यानंतर याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी ही चौकशी केली होती. त्यानंतर 25 फेब्रुवारी 2022 रोजी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
Prashant Padole : दिल्लीहून परतताना जीवघेणा प्रवास, पण नशीब साथीला
युक्तीवाद ग्राह्य
नाना पटोले यांनी कोर्टात दावा दाखल केल्यानंतर रश्मी शुक्लाही सरसावल्या. त्यांच्या वकिलांनी कोर्टात अर्ज दाखल केला. दावा रद्द करण्याची मागणी कोर्टाला केली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टानं शुक्ला यांचा अर्ज दाखल करून घेतला. याप्रकरणात मानहानीचा दावा दाखल होऊ शकत नाही, असं शुक्ला यांच्या वकिलांचा युक्तीवाद होता. मूळ तक्रारीमध्ये नाना पटोले यांच्या विरोधात कोणतेही आरोप नव्हते. एकूणच तक्रार पटोले यांच्या विरोधात नाही. त्यामुळं पटोले हे दावा करून शकत नाही, असं शुक्ला यांच्या वकिलांनी सांगितलं. याबाबतची एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. याकडेही शुक्ला यांच्या वकिलांनी दिवाणी कोर्टाचं लक्ष वेधलं.
फोन टॅपिंगचे एकूण प्रकरण, तक्रार आणि एफआयआर रद्द असे सगळे मुद्दे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश आनंद मुंडे यांनी ग्राह्य धरले. त्यानंतर पटोले यांच्या मानहानीसाठी नुकसान भरपाई मागणारा अर्ज रद्द केला. रश्मी शुक्ला यांच्याकडून अॅड. देवेंद्र चव्हाण यांनी मांडलेले सर्व मुद्दे कोर्टाने ग्राह्य धरले. पटोले यांच्यावतीने अॅड. ए. आर. पाटणे यांनी बाजू मांडली. परंतु कोर्टानं शुक्ला यांच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायनिवाडा केला. आता यासंदर्भात पटोले उच्च न्यायालयात जाणार का? याकडं सर्वांचं लक्ष आहे. मात्र दिवाणी कोर्टाच्या या निकालामुळं शुक्ला प्रकरणात पटोले यांना झटका बसलाय हे निश्चित.