मतदानासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रचाराची रणधुमाळी उडत आहे. यात ठाकचंदची ठाकुरकी जोरात आहे.
Maharashtra राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच ढवळून निघाले आहे. सगळीकडे निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. एखादा अपक्ष उमेदवार पक्षांच्या उमेदवारावर भारी पडेल असे क्वचित पहायला मिळते. मात्र भंडारा जिल्ह्याच्या तुमसर मोहाडी मतदारसंघात अपक्ष उमेदवार ठाकचंद मुंगुसमारे यांच्या बाबत असे घडत असल्याचे दिसत आहे. NCP अजित पवार गटाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार राजू कारेमोरे मेदानात आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस Sharad Pawar गटाचे उमेदवार माजी आमदार चरण वाघमारेही मैदानात आहेत. पण ठाकचंद यांनी या सगळ्यांना ओव्हरटेक केल्याचे दिसत आहे.
प्रस्थानित उमेदवार रिंगणात असताना ठाकचंद हे केव्हाच पुढे निघून गेले आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून ठाकचंद मुंगुसमारे यांचा जोर वाढत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहाडीत बदलत चाललेले राजकीय समीकरण पाहता ठाकचंद मुंगुसमारे रंगात भंग टाकण्याचे काम करणार असं ठामपणे बोलले जात आहे.
तेली समाजाची Hattrick
तुमसर-मोहाडी मतदारसंघावर मागील तीन टर्मपासून तेली समाजाचे प्राबल्य आहे. असे असले तरी कुणबी समजाप्रमाणे कोहळी, लोधी, पोवर समाज ‘गेम चेंजर’ ठरला आहे. त्यात या दोन्ही जातींचे ‘हेवीवेट’ नेते उमेदवार आहेत. हे नेते उमेदवार असताना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरणे ‘भारी जिगर’ असल्याचे लक्षण मानले जात आहे. हे जिगर दाखविण्याची हिंमत ठाकचंद मुंगुसमारे यांनी केल्याचे बोलले जात आहे.
नरेंद्र भोंडेकरांसाठी Bhandara मध्ये शिंदे पितापुत्र फ्रंटफूटवर
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाचा-भतीजावाद सुरू आहे. काका-पुतण्याच्या भांडणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळीचे काटे विखुरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष आणि पक्षातील नेते विभागले गेले आहेत. त्यामुळे भंडारा जिल्हातील ‘हेवीवेट’ नेते अजित पवार गटाकडे गेले आहेत. शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी भंडाऱ्यात आहे. पण ही तुतारी वाजवायला नेतेच नाहीत. त्यामुळे तेलंगणातील भारत राष्ट्र समितीच्या मोटारीतून नुकतेच उतरलेल्या चरण वाघमारे यांना साहेबांच्या राष्ट्रवादीने जवळ केले आहे.
Telangana मध्ये पंक्चर
बीआरएसची मोटार तेलंगणाच्या निवडणुकीत मतदारांनी पंक्चर केली. तेलंगणात बीआरएस पराभूत झाल्याने भंडाऱ्यात चरण वाघमारे यांच्या राजकीय गाडीच्या चाकातील हवाही निघून गेली. आता शरद पवारांचा पक्ष भंडाऱ्यात जवळपास मृतप्राय आहे. त्यात ठाकचंद मुंगुसमारे यांनी साहेबांच्या पक्षाला नवसंजीवनी दिली. ठाकचंद यांची गाडी राजकीय हायवेवर व्यवस्थित चालली होती. अशातच चरण वाघमारे यांनी ’राँग साइड’ने येत ठाकरचंद यांना ‘ओव्हर टेक’ केले. पवार साहेबांना चरण हे शरण गेले. त्यामुळे ठाकचंद यांच्यासारख्या निष्ठावंताला बाजूला करीत पवारांनी पक्षाची तुतारी वाघमारे यांच्या हाती सोपविली.
वाघमारे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी आणि ठाकचंद मुंगुसमारे यांनी बंडखोरी अपक्ष उमेदवारीचे आरव्हान उभे केले. ठाकचंद मुंगुसमारे यांची बंडखोरी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांना फायद्याची ठरेल, असे आरोप होऊ लागले होते. मात्र यावर मुंगुसमारे यांच्या पाठीशी पक्षाने उभे राहात त्यांना निवडून आणने हाच एक पर्याय उरल्याचे त्यांचे समर्थक बोलत आहेत.
आता होणार Tough Fight
मुंगुसमारे यांच्या उमेदवारीत ‘कृष्ण’ नावाने प्रसिद्ध जिल्हा परिषद सदस्य एकनाथ फेंडर यांची भूमिका महत्वाची आहे. ज्याप्रमाणे शिवसेना फोडण्यास एकनाथ शिंदे कारणीभूत ठरले. तसेच हे एकनाथही महत्वाचे ठारणार आहेत. अपक्ष उमेदवार उभे करून त्याला निवडून आणण्यास हेच एकनाथ फेंडर कारणीभुत ठरणार आहेत. मोहाडी-तुमसरची विरोधी कार्यकर्त्यांची महाविकास आघाडीला मुंगुसमारे यांच्या बरोबर आणण्यास त्यांचेच सुर्दशन चक्र कामी आले आहे.
तुमसरातील नाराज काँग्रेसी कलाम शेख, रमेश पारधी, शंकर राऊत यांना पुन्हा वाघमारे ‘चरणी’ आणण्यास चतुर्वेदाचे ज्ञाता सतीश यांना अद्याप यश आलेले नाही. हे आता समोर आले आहे. त्यामुळे त्यांची नाराजी भोवणार तर नाही ना? याची काळजी घेणेही गरजेचे आहे. त्यामुळे ठाकचंद मुंगुसमारे यांना ‘अंडर एस्टिमेट’ करणे भोवणार यात शंकाच नाही.