
लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. आघाडीतील नेत्यांनी एकमेकांविरुद्ध आरोपाचा कोळसा उगाळण्यास सुरुवात केली आहे.
लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक पाहता काँग्रेसने महाविकास आघाडी कायम ठेवावी की स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी या मुद्द्यावर तयारी सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या याच विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषत: काँग्रेसचे स्थानिक नेते, कार्यकर्ते या मुद्द्यावर वेगवेगळी मतं दर्शवताना दिसत आहेत. प्रदेश काँग्रेस समितीच्या निर्णयावर अंतिम काय ते ठरेल. मात्र या विषयावर विचारमंथन आताच सुरू आहे. महाविकास आघाडीचे भवितव्य स्थानिक पातळीवर कसे असावे, यावर सध्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला निर्णय घ्यायचा आहे.
महाविकास आघाडीच्या अस्तित्वाची सुरुवात 2019 मध्ये झाली. त्यानंतर अनेक निवडणुकीत आघाडी एकत्र लढली. विशेषत: 2024 मधील विधानसथा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन प्रमुख पक्षांच्या आघाडीने राज्यभरात आपली ताकद दाखवली.त्यानंतर काही ठिकाणी आघाडीतील संघर्ष वाढला. बऱ्याच ठिकाणी आपसातील असहमती दिसून आली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवारीच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला. ज्यामुळे महाविकास आघाडीला काही ठिकाणी पराभव देखील स्वीकारावा लागला.

तीन पक्षांचा Triangle
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडी कायम ठेवावी काय, यावर विचार सुरू केला आहे. काँग्रेसने स्वबळावर लढावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही मध्यंतरी यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वतंत्रपणे लढली तर प्रत्येकाची ताकद दिसेल असं मत व्यक्त केलं होतं.
चंद्रपूर-वणी-आर्णीच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह काही काँग्रेसचे प्रमुख नेते काँग्रेसनं महाविकास आघाडी सोडून स्वबळावर निवडणूक लढवावी असं म्हणत आहेत. हाच सूर सध्या चंद्रपुरात ऐकायला मिळत आहे. यासोबतच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुभाष धोटे यांनी देखील काँग्रेसने स्वबळावर लढावे, असे स्पष्टपणे म्हटले आहे.
Mahayuti झाली सज्ज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आगामी तीन महिन्यांत होऊ शकते असे संकेत दिले आहेत. या घोषणेनंतर भाजपने आपली तयारी सुरू केली आहे. भाजपने सदस्य नोंदणी मोहिम हाती घेतली आहे. जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत भाजपनं आणखी ताकद मिळवण्याची योजना आखली आहे. याउलट काँग्रेसच्या कामकाजात संथपणा दिसत आहे.
काँग्रेसने निवडणुकीसाठी वेगळी व्यूहरचना करीत आहे. महाविकास आघाडी कायम ठेवली तर काँग्रेसला शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत परत एकत्र काम करावे लागेल. या एकजुटीचा फायदा मिळवता येईल, असं सांगितलं जात आहे. दुसरीकडं काँग्रेसनं स्वबळावर लढायचे ठरवल्यास त्यांना पक्षांतर्गत एकत्रिकरणाच्या बाबतीत खूप मेहनत घ्यावी लागेल.
नको व्हायला बिघाडा
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत तीन तिघाडा काम बिघाडा असं झालं. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील मतभेद वाढले. काँग्रेस आणि शिवसेनाही समोरासमोर आली. अनेक ठिकाणी उमेदवारीवरून शाब्दिक वाद झाले. काही ठिकाणी धक्काबुक्कीपर्यंत वाद गेला. निवडणुकीच्या काही महिन्यात असंतोष वाढला. काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये आताही आरोप-प्रत्यारोप कायम आहेत. त्यामुळं काँग्रेसने आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी कायम ठेवू नये, अशी मागणी होत आहे.
Accident मधील जखमीला उपचार मिळाल्यानंतरच MP पडोळेंमधील डॉक्टर शांत
स्वबळाबाबत काँग्रेसच्या प्रदेश समितीने अंतिम निर्णय घेण्याचे सुचविले आहे. जिल्हा आणि स्थानिक पातळीवरील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये महाविकास आघाडीच्या भविष्यासाठी अनेक विचार मंथन होत आहे. खासदार धानोरकर यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते स्वबळाच्या बाजुने आहेत. खासकरून जिल्ह्यातील कार्यकर्ते, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयार होत आहेत. त्यांचाही स्वबळाचा रेटा आहे. महाविकास आघाडीला कायम ठेवणे ही काँग्रेससाठी आणखी धोक्याची गोष्ट ठरू शकते, असं कार्यकर्त्यांचं मत आहे.
BJP मध्ये खुशी Congress कम
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये आनंद आहे. काँग्रेसच्या जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळं भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसला चांगली टक्कर देण्याची तयारी भाजपनं केली आहे. काँग्रेसच्या तुलनेत भाजपचा कार्यप्रणालीचा वेग अधिक वाढलेला दिसत आहे. त्या तुलनेत काँग्रेसला आघाडी कायम ठेवण्याचं आव्हान आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची मनस्थिती सध्या वेगळी आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेणे आता गरजेचे झाले आहे. यंदा काँग्रेसला धोरण बदलावे. एक नवा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. त्यासाठी आवश्यक तितकी रणनीती आखणे महत्त्वाचे ठरेल. त्यामुळं यंदा राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस वेगळ्या तयारीत दिसेल असं सांगितलं जात आहे.