महाराष्ट्र

निवडणुकीच्या वरातीनंतर Radhakrishna Vikhe Patil येणार अकोल्यात

विमानाने घेणार Shirdi कडे झेप

Share:

Author

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये गायब राहणारे राधाकृष्ण विखे पाटील यांचे शुभ चरण अकोल्याला लागणार आहेत. कृषी विद्यापीठातील कार्यक्रमाच्या निमित्ताने ते काही क्षण अकोल्यात येणार आहेत.

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि अकोल्याचे माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना अखेर अकोल्यामध्ये येण्याचा शुभ मुहूर्त सापडला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात अकोल्याकडे ढुंकूनही न पाहणारे विखे पाटील पुन्हा एकदा मंत्री झाल्यानंतर अकोल्यात येणार आहेत. महाराष्ट्र मध्ये Mahayuti सरकार सत्तेवर आल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांना अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले होते.

अकोल्याचे पालकमंत्री झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी कधी या जिल्ह्याकडे गांभीर्याने लक्ष दिलेच नाही. अकोल्यामध्ये महापूर आला. दंगल झाली. तरीही राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोला जिल्ह्याबद्दल प्रचंड अनास्था दाखवली. आपल्या या अनास्थेचा अकोला जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला फटका बसू शकतो, याची पर्वा देखील त्यांनी केली नाही. अखेर विधानसभा निवडणूक मध्ये जनतेच्या सर्व एकत्र नाराजीचा फटका भारतीय जनता पार्टीला बसला.

पद नव्हे Parinay Fuke नाम ही काफी है..

Once Again हवाहवाई

अलीकडेच सत्तेवर आलेल्या महायुती सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा मंत्रिपदाची जबाबदारी आली आहे. त्यानंतर लगेचच राधाकृष्ण विखे पाटील यांना अकोल्यात येण्यासाठी मुहूर्त सापडला. स्वातंत्र्य दिनाच्या शासकीय ध्वजारोहण सोहळ्याला गायब राहणारे विखे पाटील अकोल्यात येत आहेत. मात्र यंदाही त्यांचा दौरा धावपळीचाच राहणार आहे. खास विमानाने ते लगेचच शिर्डीकडे रवाना होणार आहेत.

माझ्या सरकार मध्ये आता नेतृत्व बदल झाला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. यंदा पश्चिम विदर्भातून आकाश पांडुरंग फुंडकर यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे महायुती सरकारला विखे पाटील यांच्या कार्यकाळामध्ये अकोल्यासाठी जे करता आले नाही, ते करण्याची संधी चालून आली आहे. फुंडकर यांच्या संपूर्ण परिवाराचे अकोल्याशी जुने ऋणानुबंध आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यामध्ये विखे पाटील यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला जे करता आले नाही, ती आता करता येऊ शकते.

देणार का New Year Gift

पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील अकोला जिल्ह्याला काहीच देऊ शकले नाही. आता जलसंपदा मंत्री झाल्यानंतर ते पुन्हा एकदा अकोला जिल्ह्यामध्ये येत आहेत. त्यामुळे पालकमंत्री म्हणून जरी त्यांना काही देता आले नाही, तरी जलसंपदा मंत्री म्हणून अकोला जिल्ह्यासाठी ते काहीतरी देऊ शकतात. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मन खूप मोठे आहे असे बोलले जाते. त्यामुळे आपल्या अकोल्यातील दौऱ्यात राधाकृष्ण विखे पाटील हे पश्चिम विदर्भातील उपेक्षित अकोला जिल्ह्याला काहीतरी ‘न्यू इयर गिफ्ट’ नक्की देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!