
सातत्यानं आपल्या वाचाळवीरपणामुळं आमदार संजय गायकवाड चर्चेत राहतात. आता त्यांनी पुन्हा एकदा जाहीरपणे अश्लील भाषेचा वापर केला आहे.
बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड सतत चर्चेत राहतात. आता तर त्यांनी जाहीर सभेत अश्लील भाषेचा वापर केला आहे. गायकवाड यांनी बुलढाण्यात एका जाहीर सभेत केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. गायकवाड यांची जीभ घसरली. त्यांनी पैशांसाठी मतं विकणाऱ्यांना चक्क वेश्या असं संबोधलं आहे. गायकवाड यांच्या या गंभीर विधानामुळं तीव्र संताप व्यक्त होत आहे. संजय गायकवाड यांचख हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यात गायकवाड मतदारांनाच अश्लील बोलताना दिसत आहेत.
‘तुम्ही मला साधं एक मत देऊ शकत नाही? फक्त दारू, मटण, पैसे? अरे दोन दोन हजारांत विकले गेले साले. दोन हजारात? पाच हजारात? यांच्यापेक्षा तर रांXXX बऱ्या’, असं संजय गायकवाड यावेळी म्हणाले. ‘एकीकडे हा आमदार आपल्या लेकीबाळींचं कल्याण करायला निघाला. मतदारसंघाचं कल्याण करायला निघाला आहे. माझा त्यात कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही. पण हे लोक संजय गायकवाडला पाडा वगैरे म्हणत होते. समजा मी पडलो असतो तर सगळे प्रकल्प होऊ शकले असते का? माझं आव्हान आहे, एक खडाही पडला नसता’, असं गायकवाड म्हणाले.

शिवसेनेकडून टीका
आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाचा खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. मतदारांना जर कुणी वेश्या म्हणत असेल आणि लोकशाहीला रखेल म्हणत असेल आणि संविधानाला कुणी गुलाम मानत असेल तर देवेंद्र फडणवीस यांची ती जबाबदारी आहे. मतदार दोन-दोन हजारांना विकत घेतल्याचं गायकवाड म्हणाले. हे चुकीचं असल्याचं राऊत म्हणाले. मतदारांना वेश्या म्हणणं, अश्लील बोलणं हे चुकीचं असल्याचंही राऊत यांनी नमूद केलं. याबाबत विधानसभेचे अध्यक्ष, राज्यपाल यांनी मत व्यक्त केलं पाहिजे. मतदारांना विकत घेण्यात आलं हे सरळ आमदार म्हणत आहेत, अशी टीकाही राऊत यांनी केली.
Maharashtra: While addressing a public gathering in Buldhana, MLA Sanjay Gaikwad says, “The voters here were sold for 2-5 thousand rupees, alcohol, and meat. Even a prostitute is better than that” pic.twitter.com/xyexdhQnbY
— IANS (@ians_india) January 6, 2025
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी लाडकी बहीण योजना ओझं असल्याचं नमूद केलं. दोन लाख कोटींचं कर्ज झालं आहे. अशा योजना म्हणजे सरकारवर ओझं असं म्हणत कोकाटे यांनी भूमिका मांडली. सरकारी तिजोरीवर भार टाकणं तुम्हाला जमत नाही. मात्र शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांचं वक्तव्य मी गंभीर मानतो. कोट्यवधी मतदारांना जर कुणी वेश्या म्हणत असेल तर एकनाथ शिंदेंनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मतदारांना वेश्या कसं काय म्हटलं जाऊ शकतं, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.