महाराष्ट्र

शासकीय वसतिगृहात Buldhana येथे अत्याचार

संतप्त नागरिकांनी Action घेण्याची मागणी

Author

राज्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बुलढाण्यातही  असाच प्रकार समोर आला आहे. त्यामुळं खळबळ उडाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात असलेल्या शासकीय वसतिगृहात धक्कादायक प्रकार घडला आहे. यात वसतिगृहाच्या अधीक्षकानं बालकाचं शोषण केलं आहे. पीडित मुलगा 13 वर्षांचा आहे. चिखली तालुक्यातील पेठ येथे हा प्रकार घडला आहे. त्यामुळं खळबळ उडाली आहे. संतप्त नागरिकांनी याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. यापूर्वी राज्यात कल्याण येथील शाळेत घडलेल्या प्रकारावरून राजकीय वातावरण तापलं होतं. आता बुलढाण्यात चक्क एका बालकाचं शोषण करण्यात आलं आहे. अधीक्षकानेच हे घृणास्पद कृत्य केल्याचे उघड झालं आहे. अमडापूर पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे.

विनायक (विनोद) देशमुख (वय 52) असे आरोपी अधीक्षकाचे नाव आहे. तो पेठ येथील रहिवासी आहे. ज्या वसतिगृहात हा प्रकार घडला ते मागासवर्गीय मुलांचं वसतिगृह आहे. शासकीय अनुदानावर हे वसतिगृह चालविण्यात येतं. या हॉस्टेलमध्ये जाला जिल्ह्यातील एक विद्यार्थी वास्तव्यास आहे. त्याचे पालक मजुरी करतात. शिक्षण घेण्यासाठी त्याला येथे अॅडमिशन देण्यात आली होती. मात्र हॉस्टेलच्या अधीक्षकानंच मुलासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केले. सुमारे तीन महिने अधीक्षकानं या मुलाचं शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलानं हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला.

पीडित मुलाच्या परिवारानं अमडापूर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. ठाणेदार निखिल निर्मळ यांनी याप्रकरणी चौकशी केल्यानंतर रितसर गुन्हा नोंदविला. देशमुख याला तातडीनं अटकही करण्यात आली. अधीक्षक देशमुख याला ब्लडप्रेशर आणि डायबिटीजचा त्रास आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर देशमुख याची प्रकृती बिघडली. त्यामुळं त्याला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. देशमुख यांच्यावर चिखली येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलेत. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर त्याला कोठडीत डांबण्यात आलं आहे.

अलीकडच्या काळात शासकीय वसतिगृहेदेखील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित नसल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. यापूर्वी खामगाव येथेही अत्याचाराचा प्रकार घडला होता. काही वसतिगृहांमध्ये मुला, मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. चिखली तालुक्यातील या प्रकारानंतर सर्वसामान्य घरातील पालकांना मुलामुलींच्या सुरक्षेबाबत चिंता सतावत आहे. वसतिगृहातील अल्पवयील मुलामुलींच्या सुरक्षेबाबत कोणते उपाय करावे असा प्रश्न आता सर्वच पालकांना सतावत आहे. त्यामुळं यासंदर्भात सरकारी पातळीवर कठोर उपाय गरजेचे झाले आहेत. यावर सरकार कोणते उपाय करते याकडं सर्वांचं लक्ष आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!