
राज्यातील जलसंधारण आणि मृदा संवर्धनाचे काम आता व्यापकपणे करण्यात येणार आहे. एकाच जिल्ह्यातील दोन मंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दोन मंत्र्यांनी शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम तयार केला आहे. हे दोन्ही मंत्री मिळून मृद व जलसंधारण वाढवण्यासाठी काम करणार आहे. हे दोन मंत्री आहेत संजय राठोड आणि इंद्रनील नाईक. राज्यातील मृदा व जलसंधारण विभागात व्यापकपणे काम केलं जाणार आहे. यासाठी संजय राठोड यांनी मंत्रालयामध्ये महत्त्वपूर्ण बैठक घेतली. संजय राठोड हे या विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक यांच्याकडे मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री पद आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील या दोघांनी एकत्र येत राज्यासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे. महाराष्ट्रातील कृषी विभागाला मोठ्या प्रमाणावर सिंचनाची सोय लागणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी कृषी सिंचन क्षमता वाढवण्यात येणार आहे. या संदर्भातील सूचना दोन्ही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली. सध्या राज्यामध्ये जलसाठा आणि भूजल पातळी याचा आढावा देखील दोन मंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
टोकाची टीका करीत Amol Mitkari अन् Sandip Kshirsagar यांच्यात जुंपली
Yavatmal जिल्ह्याचा डंका
महाराष्ट्राचे मंत्रिमंडळामध्ये सध्या यवतमाळ जिल्ह्याचा बऱ्यापैकी डंका आहे. यवतमाळ जिल्ह्यातून तीन आमदारांना मंत्री करण्यात आली आहे. यामध्ये संजय राठोड, अशोक उईके आणि इंद्रनील नाईक यांचा समावेश आहे. त्यामुळे सहाजिकच विकास कामांचे बाबतीत यवतमाळ जिल्ह्याला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. या तीनही मंत्र्यांनी एकत्रितपणे काम केल्यास यवतमाळ जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला जाऊ शकतो.
विदर्भातील यवतमाळ जिल्हा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेला जिल्हा आहे. लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये सभा घेतली होती. मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार झाल्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम घेतला होता. अलीकडच्या काळातही नरेंद्र मोदी अनेकदा यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यामुळे केंद्रीयस्तरावर यवतमाळ जिल्ह्याला काहीतरी मिळणार, असं दिसत होतं. महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यामधून तीन आमदारांना मंत्री केले. त्यातील दोन आमदार आता ताकदीने कामाला लागण्याचे दिसत आहे.
मृद व जलसंधारण विभागाच्या बैठकीमध्ये कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जलसंधारण व कृषी क्षेत्र नवीन प्रयोग राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या बदलांमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल, अशी माहिती यावेळी संजय राठोड आणि इंद्रनील नाईक यांनी दिली. पंतप्रधान कृषी सिंचन योजना यावरही बैठकीत निर्णय घेण्यात आला. पाणलोट विकास घटकाचा दुसरा टप्पा आहे राबविण्यात येणार आहे. यासाठी राज्यामध्ये पाणलोट यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती दोन्ही मंत्र्यांनी दिली.