
मानव-वन्यजीव संघर्ष अलीकडच्या काळात वाढला आहे. वन जमिनीवर अतिक्रमण होत आहे. त्यामुळं वन्यजीव मानवी वस्तीत शिरत आहेत. यावर वनमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.
वन्यप्राण्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी अभिनव आणि संवेदनशील उपाययोजना करण्यात येणार आहे. या विषयावर भारतातील पहिली परिषद चंद्रपुरात पार पडली. याचा आनंद आहे. केंद्र सरकार आणि विविध राज्यातील अनेक तज्ज्ञांनी या संवेदनशील विषयावर चिंतन आाणि मंथन केले. तज्ज्ञांच्या निष्कर्षातून मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग निघेल, असा विश्वास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. चंद्रपूर येथील वन अकादमी येथे ‘वाअल्डकॉन 2025’ या दोन दिवसीय परिषदेचा समारोप झाला. त्यावेळी नाईक बोलत होते.
व्यासपीठावर चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता बिस्वास, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विवेक खांडेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (व्यवस्थापन) एम.एस.राव, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे (एफडीसीएम) व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड, वन अकादमीचे संचालक एम.एस. रेड्डी, चंद्रपुरचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, शोभा फडणवीस आदी उपस्थित होते.

विद्यमान वनमंत्र्यांकडून Sudhir Mungantiwar यांचं तोंडभरून कौतुक
Forest मधील हस्तक्षेप थांबणार
वन परिसरात अतिक्रमण होत आहे. प्राण्यांनी मानवाच्या जागेत घुसखोरी केली का, हा देखील संशोधनाचा विषय आहे. वन्य प्राण्यांची संख्याही वाढली आहे. मानवी लोकसंख्याही वाढत चालली आहे. जमीन मात्र मर्यादीत आहे. त्यामुळं वनांच्या क्षेत्रात विकास कामं केली जात आहेत. त्यामुळे प्राण्यांच्या अधिवासाची जागा कमी झाली आहे. याचाच परिणाम म्हणून मानव-वन्यजीव संघर्षात वाढ असल्याचं दिसत आहे.
माणूस आणि वन्यजीव दोन्ही जगले पाहिजे. यावर काही देशांनी उपाय कले आहेत. त्याचा वन अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा, असंही नाईक म्हणाले. वन विभागात अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्याचा अहवाल सादर करावा. चंद्रपुरातील टायगर सफारी प्रकल्पाला समोर नेण्याचा प्रयत्न केला जाईल. चंद्रपुरातील स्थानिकांना ताडोबा सफारीचे शुल्क कमी करता येईल का, यावर विचार होणार आहे. अधिकाऱ्यांनी त्याचं नियोजन करावं. वन विभागाला निधी कमी पडणार नाही, असंही वनमंत्री नाईक म्हणाले. नागरी वस्तीत वन्यजीव येत आहेत.
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी चिंता व्यक्त केली. ‘वाइल्ड लाइफ टुरीजम’ लोकांना आनंद देणारा व्यवसाय आहे. त्यातून रोजगार निर्मिती होण्यास मदत मिळेल, असं ते म्हणाले. प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता बिस्वास यांनी नवीन मनुष्यबळाची मागणी केली. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विवेक खांडेकर यांनी मानव व वन्यजीव यांना वाचविण्यासाठी प्रयत्न व्हावे, असं मत व्यक्त केलं. 20 जिल्ह्यात ‘रॅपीड रेस्क्यू टीम’ची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.