
देशात सर्वात कठीण परीक्षण पैकी एक यूपीएससी परीक्षा आहे. एखादा सर्वसामान्य व्यक्ती देखील मोठे पद मिळवू शकतो. हे आयपीएस अधिकारी नितीन बगाटे यांचे जीवन प्रवासातून दिसून येते.
आयुष्यात अशक्य असे काहीच नाही. जिद्द असली की सर्व काही मिळवता येते. कोणीतरी म्हटलेच आहे की, दृढ संकल्प आणि कठोर मेहनत केल्याने एखादा व्यक्ती आपले आयुष्य बदलू शकतो. या म्हणीचे जीवंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी डीएसपी नितिन बगाटे यांचा जीवनप्रवास.
नितीन बगाटे यांचा एका गरीब कुटूंबात जन्म झाला. एकेकाळी नितीन बगाटे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर भाजी विकत होते. हा भाजी विकणारा व्यक्ती, एक दिवस त्याच कार्यालयात आयपीएस अधिकारी म्हणून येईल, असा विचार स्वप्नातही कोणीच केला नव्हता. नितीन बगाटे यांच्या संघर्षातून स्पष्ट होते की, मनातून दृढ निश्चय असला की, अशक्य वाटणारी गोष्ट देखील शक्य होऊन जाते. कठोर मेहनत केल्याने, सर्वसामान्य मुलगा देखील मोठा अधिकारी होऊ शकतो, हे नितीन बगाटे यांनी दाखवून दिले आहे.

UPSC परीक्षेत यश
आयपीएस नितीन बगाटे हे हिंगोली जिल्ह्यातील निशाणा येथील रहिवासी आहेत. आपल्या परिवाराला आर्थिक मदत व्हावी म्हणून नितीन बगाटे शहरातील एसपी ऑफिसच्या समोर भाजी विकत होते. देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय नितीन बगाटे यांनी घेतला. हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. अनेक अडचणी आणि आव्हानांना सामोरे जात नितीन बगाटे यूपीएससी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. आयपीएस अधिकाऱ्याचे होऊन नितीन बगाटे यांनी आपल्या सोबत परिवाराचे स्वप्न पूर्ण केले. अनेक तरुणांसाठी त्यांची कहाणी प्रेरणादायी आहे. स्वप्न कितीही मोठे, कठीण आणि आव्हानं देणारे असले तरी कठोर मेहनत व दृढ संकल्पाने साकार केले जाऊ शकते.
यूपीएससीची तयारी करताना नितीन बकाटे यांना अनेकवेळा अपयश आले. अतिशय मेहनत करूनही तीन वेळा मुलाखतीपर्यंत जाऊनही त्यांना यश प्राप्त झाले नव्हते. परंतु नितीन बगाटे यांनी हार मानली नाही. त्यांनी अपयशातून धडा घेतला आणि अधिक जोमाने तयारी सुरूच ठेवली. शेवटी त्यांनी यश खेचून आणलेआणले व आयपीएस पद मिळविले.
छत्रपती संभाजीनगर येथे नितीन वगाटे डीएसपी पदावर कार्यरत आहेत. संभाजीनगरचे पोलिस उपायुक्त म्हणून बदली होण्याआधी त्यांनी सिंधुदुर्ग येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणूनही कार्यरत होते. सप्टेंबर 2023 पासून ते संभाजीनगरात डीएसपी आहेत. आयपीएस अधिकारी झाल्यानंतर परभणी जिल्ह्यात 2018 ते 2020 याकाळात ते प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी तथा सहायक पोलिस अधीक्षकपदी कार्यरत होते. दबंग अधिकारी म्हणून नितीन बगाटे यांची ख्याती आहे.