
राज्यभरातील हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वारी येथील मंदिरावर दरोडा पडला आहे. चोरट्यांनी मंदिरातून लाखो रुपयांचा ऐवज पळविला आहे.
तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वारी हनुमान मंदिरावर दरोडा पडला आहे. चोरट्यांनी मंदिरातून लाखो रुपयांचा ऐवज पळविला. चोरट्यांनी सुरुवातीला पुजाऱ्याचे हातपाय बांधले. त्यानंतर एक एक करीत मंदिरातील ऐवज लुटण्यास सुरुवात केली. अज्ञात दरोडेखोरांनी मंदिराच्या पुजारीला बांधून ठेवत मंदिरातील दागिने आणि दानपेटीतील रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लंपास केला. मंदिरात चोरी झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वारीचा परिसर गाठत तपासाला सुरुवात केली.
श्वास पथकाच्या मदतीनं तपासाला सुरुवात करण्यात आली. दरोडेखोरांनी मध्य रात्रीच्या सुमारास मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पुजाऱ्याचे हातपाय बांधले. त्यानंतर मंदिरातील ऐवज लुटण्यास सुरुवात केली. हे मंदिर दुर्गम भागातील आहे. दरोडेखोरांच्या टोळी नेमके किती जण होते, याचा तपशिल अद्यापह अप्राप्त आहे. सुरुवातीला त्यांनी हनुमानाच्या मूर्तीवरील दागिने लंपास केले. त्यानंतर गणेश मूर्तीवरील मौलव्यान दागिने पळविले. हनुमानाच्या मूर्तीवर दोन हार होते. कंबरपट्टा होता. मूर्तीच्या हातावर कडेही होते. पायांमध्ये पैजण होती. कानात कुंडल होते. मुकुटही होता. त्यानंतर मूर्तीवर छत्र होते. हे सगळं चोरट्यांनी पळविलं.

तपासाचे Police पुढे आव्हान
पोलिसांनी सांगितले की, चोरट्यांनी गणेश मूर्तीवरील मुकुटही चोरला. चोरी करण्यात आलेल्या दागिन्यांचं वजन अंदाजे साडे पाच किलो असावे असं सांगण्यात येत आहे. चोरण्यात आलेले सर्व दागिने चांदीचे होते. दान पेटीतील रक्कमही गायब करण्यात आली. दान पेटीत अंदाजे एक लाख रुपये असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हा सर्व ऐवज लुटल्यानंतर दरोडेखोरांनी पलायन केलं. वारीतील हे मंदिर दुर्गम भागात असल्यानं या घटनेचा उलगडा लवकर झाला नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोनाळा पोलिसांनी मंदिराचा परिसर गाठला. तोपर्यंत स्थानिक नागरिकांनी पुजाऱ्याची मुक्तता केली होती.
वारी हनुमान मंदिर तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्याच्या सीमेवर हे क्षेत्र आहे. येथे शिवकालीन मठ आहे. आसपास वान नदीचा प्रवाह आहे. सातपुडा पर्वत रांगांमध्ये हे मंदिर वसलेलं आहे. वान अभयारण्याचा परिसर सर्वत्र आहे. जंगल, नदीचा प्रवाह आणि लहानमोठ्या धबधब्यांमुळं वारी येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. येथे असलेले हनुमान मंदिर महाराष्ट्र, मध्य प्रदेशातही प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणावर उत्सवही साजरा करण्यात येतात. भाविकांकडून या मंदिरात मोठ्या प्रमाणावर दानधर्म करण्यात येतो. त्यामुळं दरोडेखोरांनी या मंदिराला लक्ष्य केलं असावं, असं सांगण्यात येत आहे. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.