भाजपकडून प्रत्येक मंत्र्याला एक स्वीय सहाय्यक देण्यात आला आहे. पक्षाच्या कामासाठी समन्वयक अशा सहाय्यकाची नियुक्त करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले. राज्य मंत्रिमंडळाचे स्थापना आणि अनेक नाट्यमय घडामोडी पार पडल्या. त्यानंतर आता खऱ्या अर्थाने राज्यातील कामकाज गतिमान होऊ लागले आहेत. मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी त्यांचे स्वीय सहायक निवडले आहेत. 16 मंत्री अजूनही उत्तम स्वीय सहाय्यकाच्या शोधात आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कामाचा धडाका सुरू केला आहे. त्यांचे सहकारी मात्र उत्तम स्वीय सहायकच्या शोधात होते. अखेर हा शोध आता संपला आहे. सामान्य प्रशासन विभागाने 17 जानेवारी रोजी मंत्र्यांसाठी स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या नेमणूक केली आहे. शासनाच्या कार्यालयीन आस्थापनेवर असलेल्या वर्ग एक व वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांना आता मंत्र्यांच्या सेवेत तैनात करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांना स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी असल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र वित्त विभागाच्या मान्यतेसह द्यावे लागणार आहेत.
अद्यापही जागा रिक्त
मंत्री संजय राठोड, नीलेश राणे, उदय सामंत, गिरीश महाजन, गुलाबराब पाटील, गणेश नाईक, दादा भुसे, जयकुमार रावल, अतुल सावे, शंभुराज देसाई, आशिष शेलार, अदिती तटकरे, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, आकाश पुंडकर, प्रकाश आबिटकर या 16 मंत्र्यांना अजूनही स्वीय सहाय्यकाचा शोध आहे. राज्यमंत्री म्हणून सहा आमदारांनी शपथ घेतली. त्यातील केवळ चार राज्यमंत्र्यांना स्वीय सहाय्यक मिळाले. यामध्ये पंकज भोयर, मेधना बोर्डीकर, इंद्रनील नाईक, माधुरी मिसाळ यांचे भाग्य उजळले आहे. आशिष जयस्वाल आणि योगेश कदम यांना अद्यापही स्वीय सहाय्यक प्राप्त झालेले नाहीत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहायक म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पशुधन विकास अधिकारी डॉ. अमर भडंगे स्वीय सहायक मिळाले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन पीए म्हणून देण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींमी, तहसीलदार प्रशांत पाटील व कक्ष अधिकारी राहुल गांगुर्डे यांचीही नियुक्ती झाली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना उपायुक्त जयदीप पवार, नायब तहसीलदार डॉ. गौरी शंकर चव्हाण यांची नेमणूक मिळाली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे अवर सचिव नंदकुमार आंदळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे यांना नेमण्यात आलं आहे.