महाराष्ट्र

उत्कृष्ट निवडणूक अधिकारी ठरले IAS Ajit Kumbhar

अकोल्यात Lok Sabha निवडणुकीत उल्लेखनीय कामगिरी

Share:

Author

लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याने जिल्हाधिकऱ्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून लोकसभा निवडणुकीत उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कारासाठी अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय मतदारदिनी 25 जानेवारीला पुणे येथील राज्यस्तरीय कार्यक्रमात हा पुरस्कार अजित कुंभार यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

अकोल्यातील लोकसभा मतदारसंघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी काम काम सांभाळले होते. त्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. 25 जानेवारी शनिवारी राष्ट्रीय मतदारदिनी पुणे येथील कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

केंद्र बदलल्यानं Chandrapur मध्ये तरुणांना भुर्दंड

टीमवर्कचा परिणाम

लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने अविश्रांत परिश्रम घेतले. सर्वांनी निवडणुकीची प्रक्रिया सुव्यवस्थितपणे पार पाडली. सर्वांच्या योगदानामुळे जिल्ह्याला पुरस्कार प्राप्त झाला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपविभागीय अधिकारी अनिता भालेराव आदींनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे अभिनंदन केले.

लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर बघायला मिळाली. अकोला मतदारसंघासाठी 2024 मधील लोकसभा निवडणुकीत अनुप धोत्रे यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधित्व केले होते. डॉ. अभय पाटील यांनी काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले होते. अकोला मतदारसंघात सर्वांना वाटत होते की, काँग्रेस उमेदवार अभय पाटील यांचा विजय होणार. परंतु वेळेचा काटा फिरला आणि भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी विजय प्राप्त केला.

अनुप धोत्रे यांनी चार लाख 57 हजार 30 मते मिळवली. एकूण मतदानाच्या 38.96 टक्के मते. धोत्रे यांचे सर्वात जवळचे प्रतिस्पर्धी, काँग्रेसचे अभय पाटील यांना 416 हजार 404 मतं प्राप्त झाली. जे एकूण मतदानाच्या 35.50 टक्के आहेत. अनुप धोत्रे यांनी एकूण 40 हजार 626 मतांनी अभय पाटील यांचा पराभव केला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!