महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar म्हणतात.. विरोधकाचेही घर असावे शेजारी

बीडच्या प्रगतीची स्पीड पकडण्यासाठी Pankaja Munde यांनी इच्छा व्यक्त केली असावी

Author

 महायुतीत नाराजीचा सुर सुरू असल्याची चर्चा सर्वत्र रंगात आहे. एकनाथ शिंदे आणि महायुतीतील इतर नेते नाराज असल्याच्या चर्चेवर सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे. 

राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. एखादी इच्छा व्यक्त करण्याला नाराजी म्हणणे समर्पक नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष महायुतीचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्या काही कार्यकर्त्यांसाठी व आमदारांसाठी काही इच्छा व्यक्त करणं हे गैर आहे, असे आपण मानत नसल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. ते दावोस वरून आल्यानंतर या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चर्चा करून घेतील. एकमेकांच्या संमतीने आणि स्वइच्छेने या चर्चेतून निश्चित करतील. त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टीच्या संदर्भात मत मांडताना नाराज आहेत, असे म्हणणे योग्य नाही. असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

उत्कृष्ट निवडणूक अधिकारी ठरले IAS Ajit Kumbhar

Imaginary चित्र तयार करणे गैर 

पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची मागणी केली होती. परंतु त्यांना ते प्राप्त झाले नाही. त्यावर मुनगंटीवार म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी सुद्धा इच्छा व्यक्त करणे गैर नाही. बीडच्या विकासाची स्पीड पकडण्यासाठी पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री पदाची इच्छा व्यक्त करण्याला नाराजी म्हणणे अयोग्य आहे. या नाराजी पोटी काहीतरी अघटीत घटना घडणार, असे कापोकल्पित चित्र तयार करणे हे गैर आहे. पंकजा मुंडे बीडच्या कन्या आहेत. बीडच्या प्रगतीचा स्पीड व्हावा, म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

आनंद आहे, मकर संक्रांतीचा उत्सव आहे. महाविकास आघाडीही टिकावी. महाविकास आघाडी संपावी असे आम्हाला वाटत नाही. कारण लोकशाहीमध्ये विरोधक असणे गरजेचे आहे. विरोधक म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी. तसेच विरोधकाचे ही घर असावे शेजारी. ज्यामधून लोकशाहीमध्ये जनतेच्या हिताचे निर्णय घेताना योग्य पद्धतीने निर्णय घेता यावेत.

केंद्र बदलल्यानं Chandrapur मध्ये तरुणांना भुर्दंड

अन्नधान्य Gold पेक्षा महाग

एक रुपयांचे पिक विम्याने बोगस पिक विमा येतो असे म्हणणे योग्य नाही. साधारणतः शेतकऱ्यांचे पंधराशे एक्कावन कोटी रुपयांचा पिक विमा आपण भरतो. खरं तर मिशन जय किसान याची अतिशय आवश्यकता आहे. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो शेतीच्या क्षेत्राकडे आपण वीर देणे लक्ष देणे गरजेचे आहे. जर शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती करणे सोडले, तर जेवढा पैसा सोनं इम्पोर्ट करण्यासाठी लागतो. त्याहून दहा हजार पट जास्त अन्नधान्य इम्पोर्ट करण्यासाठी लागणार. सोनं इम्पोर्ट करणं हे महत्त्वाचं नाही. परंतु अन्नधान्य इम्पोर्ट करणे म्हणजे आपण नापास झालो असा त्याचा अर्थ होईल.

1956 मध्ये आपल्याला अन्न धान्य आयात करावं लागलं. आजही जगामध्ये दहा एक्सपोर्ट करणाऱ्या देशांपैकी आपल्या देशाचे नावच नाही. त्यामुळे आपल्याला अतिशय काळजीपूर्वक “मिशन जय किसान” करण्याची आवश्यकता आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!