महाराष्ट्र

Bhandara जिल्ह्यातील आयुध निर्माण कारखान्यात मोठा स्फोट 

छत कोसळल्याने अनेक कर्मचारी जखमी 

Share:

Author

भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण दारूगोळा तयार करणाऱ्या कारखान्यात 24 जानेवारी शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास भिषण स्फोट झाला आहे. ज्या  LTCE 23 इमारती मध्ये स्फोट झाला तिथे 13  कामगार काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.  ज्या ठिकाणी स्फोट झालेला आहे.  ती इमारत संपूर्णतः जमीन दोस्त झालेली आहे. त्यामुळे जेसीबीच्या साह्याने इमारतीच्या मलबा खाली दबलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

NDRF ची टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली आहे.  या मधून 7 जखमी लोकांना बाहेर काढण्यात  प्रशासनाला यश मिळाले आहे. स्फोटामध्ये गंभीर जखमी झालेले संजय राऊत, नरेंद्र वंजारी, राजेश बडवाईक, सुनील यादव,  जयदीप बॅनर्जी, मनोज मेश्राम, यांना भंडारा येथील लक्ष हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र चंद्रशेखर गोस्वामी, अंकित बारई यांचा मृत्यू झाला आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जखमींपैकी दोन गंभीर जखमी असून इतर लोकांनाही मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या आहेत. पुढचे 42 तास या सर्वांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. या सर्वांचा योग्य तो उपचार सुरू आहे, असे लक्ष हॉस्पिटलचे डॉ. गोपाल व्यास यांनी सांगितले आहे.

मंत्र्यांच्या कामांबाबत Devendra Fadnavis झालेत कठोर

Chief Minister यांची प्रतिक्रिया

अपघाताचे वृत्त समजताच फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. फडणवीस म्हणाले, ‘भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणीतील छत कोसळल्यानंतर झालेल्या स्फोटात 13 ते 14 कामगार अडकल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनेक कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत केली जात आहे. एसडीआरएफ आणि नागपूर महानगरपालिकेच्या पथकांनाही बचाव कार्यासाठी पाचारण करण्यात आले असून ते लवकरच पोहोचतील. जिल्हा प्रशासन संरक्षण दलांच्या समन्वयाने बचाव कार्यात सहभागी आहे. वैद्यकीय मदतीसाठी पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. या घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तीला देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, भंडारा येथील आयुध कारखान्यात मोठा स्फोट झाला. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गडकरींनी एक मिनिट मौन पाळून प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून या घटनेची माहिती मिळताच खूप दुःख झाले. घटनास्थळी बचाव पथके तैनात आहेत. बाधितांना मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. बचाव पक्षाच्या प्रवक्त्याने सांगितले की, वाचलेल्यांचा शोध घेण्यासाठी बचाव आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!